लोणी दि.७( जनता आवाज वृत्तसेवा ):-देशाच्या सामाजिक इतिहासात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचे महान कार्य 20 व्या शतकात ज्या थोर पुरुषांनी केले त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अग्रगण्य होते समाजाच्या प्रगतीच्या विकासाच्या परिवर्तनशीलतेच्या मार्गातील मुख्य अडचण म्हणजे समाजातील सर्व प्रकारची विषमता होय हे त्यांनी जाणले सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना समाज प्रबोधन व जागृतीचे कार्य त्यांनी केले. याकरता शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन शक्य आहे म्हणून त्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा मंत्र दिला स्त्रियांच्याविषयक सुधारणा करता जे जे कायदे अस्तित्वात आले त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा योगदान बहुमूल्य आहे समाज परिवर्तनासाठी त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पायरेन्स आय. बी. एम. ए. चे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते पायरेन्सचे संचालक सचिव डॉ. निलेश बनकर, डॉ. मनोजकुमार लंगोटे, डॉ. सतीश बिडकर, प्रा. प्रमोद बोऱ्हाडे, प्रा .सौरभ दिघे, प्रा. ऋषिकेश धर्माधिकारी, प्रा. योगेश आहेर, प्रा. निलेश आवारी, प्रा. रेणुका तनपुरे, प्रा. रणीता वलवे, प्रा. पुजा परजणे, प्रा. संजय औताडे, प्रा. प्रमोद गोपाळे, प्रा. प्रशांत गोर्डे याचबरोबर पायरेन्स आय बी एम ए मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि एम बी ए, एमसीए, बी व्होक या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.