18.5 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

पिंपरी निर्मळ गावातील घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचे समर्थन होवू शकत नाही- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणाने पिंपरी निर्मळ गावात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचे समर्थन होवू शकत नाही.या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असून गावातील सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पिंपरी निर्मळ गावात मागील दोन दिवसांपासून घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात मंत्री विखे पाटील यांनी नागपूरहून येवून गावातील सर्व ग्रामस्थ अधिकारी आणि हल्ला झालेल्या कुटूबियांची भेट घेवून त्यांना दिलासा दिला.जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अतिरीक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर अतिरीक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालया समोरच मंत्री विखे पाटील यांनी ग्रामस्थ तरूण कार्यकर्ते महिला यांच्याकडून झालेल्या घटनेची माहीती जाणून घेतली.गावातील काही कुटूबियांकडून होत असलेल्या त्रासाची माहीती सर्वांनी मंत्र्यापुढे सांगून जाणीवपुर्वक घटनेत सहभाग नसलेल्या व्यक्तिवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे.खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आशी मागणी सर्वानी केली.

मंत्री विखे पाटील म्हणाले की,पिपरी निर्मळ गावात राजकीय झाला परंतू असा जातीय संघर्ष कधी झाला झाला नाही.परंतू झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून याचे समर्थन होवू शकत नही.

परंतू घटना घडली त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आता निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक या सर्व घटनेची निपक्षपणाने चौकशी करतील असे मंत्री विखे पाटील यांनी जाहीर केले.

ग्रामस्थांनी सुध्दा या घटनेबाबत काही माहीती चौकशी अधिकार्यांना द्यायची असेल तर द्यावी असे सूचित करून गावात विनाकारण सामाजीक तेढ निर्माण होईल असा प्रयत्न होवू देवू नका सामाजिक माध्यमातून काही मेसेज फिरत असतील तर गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेळीच थांबवावेत पोलीस प्रशासनाने सुध्दा वादग्रस्त पोस्ट टाकणार्यांवर लक्ष केंद्रीत करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

गावातील दोन कुटूबियांवर झालेल्या हल्ल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून केली.या कुटूबियांचे म्हणणे त्यांनी जाणून घेतले. प्रारंभी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्यासह अन्य अधिकार्या समवेत मंत्री विखे पाटील यांनी चर्चा केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!