टाकळीभान (जनता आवाज वृत्तसेवा):- टाकळीभान उपबाजार आवारात आज मोकळ्या कांद्यासाठी २२ वाहनांची आवक होती. यामध्ये मोठ्या कांद्याला ८०० ते १३०५ भाव मिळाला. गोलटी कांद्याला ५०० ते ८०० रुपयांपर्यंत तर खादीला २०० ते ३५० रुपय भाव मिळाला. लीलावा प्रसंगी बाजार समितीचे संचालक मयुर पटारे व संत सावता सोसायटीचे संचालक विलास दाभाडे उपस्थित होते.
टाकळीभान उपबाजार आवारात आवक दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याचा प्रयत्न असल्याचे दोन्ही संचालकांनी यावेळी सांगितले.