लोणी दि.२४ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणी यांच्यावतीने राहाता तालुक्यातील गोगलगांव येथे आरोग्य जनजागृती अभियान राबविण्यात आले या अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाने आरोग्य जनजागृती फेरी, रक्तगट तपासणी, कन्यारत्न वाचवा अभियान आणि पर्यावरण रॅली आयोजित करून साजरा करण्यात आली यास विद्यार्थी आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव यांनी दिली.
गोगलगावच्या येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय येथील इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप याप्रसंगी करण्यात आले. तसेच प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी गावामध्ये आरोग्य जनजागरण फेरी, पर्यावरण जनजागरण फेरी ,कन्यारत्न वाचवा जनजागरण फेरी व श्री भृण हत्या या विषयावर नाटिका सादर केली.हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. गणेश शिंदे, प्रा. अर्चना कदम ,प्रा. अनुपमा शिंदे, सौ. विखे, सौ काकडे यांनी परिश्रम घेतले.
प्रवरेच्या शैक्षणिक कार्याबरोबरचं सामाजिक उपक्रमाबद्दल गोगलगांव ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.