शिर्डी दि.२३ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-सेवा, समर्पण आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकासाच्या दिशेने जात आहे. विविध सामाजिक योजनातून समाज घटकांचा विकास साध्य करण्याचे यशस्वी काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य संजय टंडन यांनी केले.
लोकसभा प्रवास योजनेच्या अंतर्गत शिर्डी लोकसभा मतदारसंघात संजय टंडन यांच्या उपस्थितीत प्रबुध्द संमेलन आयोजित करण्यात आले होते.वकील डॉक्टर व्यापारी आणि उद्योजक यांच्याशी त्यांनी संवाद साधून केंद्र सरकारच्या योजनांची माहीती स्लाईड शोच्या माध्यमातून दिली.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर संघटन सरचिटणीस नितीन दिनकर माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण होत आहेत.या सर्व कार्यकाळात देशाने संपूर्ण जगात मिळवलेले स्थान भारतीयांचा गौरव आहे.राम मंदीराचे निर्माण आणि काशी विश्वेवर मंदीर परीसराच्या विकासातून संस्कृती परंपरा जतन करतानाच,देशात ३७० कलम रद्द झाले तर सक्ताचे पाट वाहातील आशी भीती निर्माण केली गेली पण रक्ताचा एक थेंबही कुठे सांडला नाही याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
टंडन म्हणाले की, सरकारचे हे ९ वे वर्ष सेवा, समर्पण, गरीब कल्याणासाठी समर्पित आहे. युक्रेन युद्धाच्या वेळी अमेरिका व रशियाबरोबर भारताने उच्च कुटनीतीने यशस्वी मध्यस्थी केली.या देशामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना यशस्वीपणे मायदेशी आणले. आज भारत देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढत आहे.डेटा ग्राहकांच्या बाबतीत हा स्मार्टफोन नंबर वन आहे. ही दुसरी सर्वात मोठी मोबाईल उत्पादक आणि तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून नवी शिक्षण प्रणाली आपल्याला मिळाली आहे.यातूनच उद्योगाच्या रोजगाराच्या संधी मिळत आहेत.सर्वाधिक स्टार्ट अप निर्माण करणारा देश म्हणून भारत ओळखला जात असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपस्थित वकील व्यापारी यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उतरे दिली.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षात देशाने केलेली वाटचाल पाहाता देश महासतेच्या दिशेने जात आहे.समाजातील शेवटचा माणूस हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून अंत्योदयाचा मंत्र कृतीत उतविण्याचे यशस्वी काम सध्या देशात सुरू आहे.केंद्र सरकारचा जनाधार हा समाजातील आपल्या सारख्या यशस्वी व्यक्तीमुळे अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमास सर्व वकील व्यापारी डॉक्टर उपस्थित होते.
संजय टंडन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महामोर्चा संमेलन टिफीन पे चर्चा उपक्रम संपन्न पक्षाच्या सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना सरकारचे काम लोकांपर्यत पोहचविण्याची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेल्या निळवंडे धरण प्रकल्पास टंडन यांनी भेट दिली.