spot_img
spot_img

सावित्रीबाई फुले संकुलातील प्रश्न सोडवू खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आश्वासन; व्यापारी असोसिएशनच्या निवेदन

अहमदनगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- सावेडी भागातील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. आता येथील व्यापारी संकुलातील अंतर्गत भागातही काँक्रीटीकरण करण्यात येईल. तसेच येथील व्यापाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सुविधाही देण्यासाठी महापालिकेस सूचना देण्यात येतील, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

नगरमधील सर्वात स्व:स्त आरोग्यसेवा देणाऱ्या ‘एमआरआय’ सेंटरचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी येथील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांशी खासदार डॉ. विखे पाटील यांनी संवाद साधला. येथील व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनी विखे पाटील यांचे असोसिएशनच्यावतीने स्वागत केले. तसेच येथील विकासकामे मार्गी लावल्याबद्दल असोसिएशनच्यावतीने विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी असोसिएशनचे सदस्य तथा लोकआवाजचे संपादक विठ्ठल लांडगे, योगेश सोनवणे, महेश कंदलवार, सुनील सिद्दम, स्वप्निल निंबाळकर, महेंद्र तिवारी, दीपक लुणावत, राहुल आव्हाड, विकास अंबिलवादे, शुभम गवळी, ॲड. अभिषेक सैंदाणे, लताताई साळवे, युवराज लालबेगी, प्रसाद सैंदाणे, विजय पवार, मनोज कांडेकर, ॲड. योगेश मांडोत, गंगाराम जगताप, राजू नांगरे, अजिंक्य मर्दाने, दीपक इवळे आदी व्यापाऱ्यांनी यावेळी निवेदन देऊन विखे पाटील यांच्याशी चर्चा केली.

दैनिक लोकआवाजचे संपादक लांडगे यांनी येथील अपेक्षित सुविधांबाबत विखे पाटील यांना माहिती दिली. त्यावर या प्रश्नांची लवकरच सोडवणूक करण्यात येईल, असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!