लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- लोणी येथे बुधवारच्या बाजार असतो. त्यादिवशी लोणी मध्ये मोठ्या प्रमाणात आसपास गावातील लोक बाजार करण्यासाठी येत असतात.
माहिती अशी आहे की, काल बुधवारी लोणी चा बाजार होता. सकाळी दहाच्या सुमारास पोलीस हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, लोणी येथील स्वागत हॉटेल जवळ चार लोक एका स्वीट मध्ये बसून लोकांकडून शिवालय मंदिर बांधायचे आहे असे सांगत रोख स्वरूपात पैसे घेऊन पावत्या फाडत असल्याचे समजले. पोलिसांनी पंचासह सदर ठिकाणी गेले असता त्यांना सदर लोक मंदिराच्या नावाखाली पैसे गोळा करतात करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्या ठिकाणी सुरेश पगारे( वय ३२), रा. खर्जुले मळा,जेल रोड, नाशिक , मिलिंद गिल्लू हट्टे( वय ३६) रा. देवळाली कॅम्प, नाशिक, सिद्धार्थ विवेक गायकवाड( वय २८) रा. डॉक्टर आंबेडकरवाडी, पुणे रोड, नाशिक निलेश विनोद सोवडे ( वय २४) रा. महाराष्ट्र हायस्कूल जवळ, नाशिक असे त्यांनी नावे सांगितले.
पोलिसांनी त्यांना शिवालय मंदिर बांधकाम कोठे होणार आहे ? त्यासाठी धर्मादाय संस्थेची ट्रस्टची नोंदणी केलेली आहे का? जमा केलेला पैसा ट्रस्टच्या ना खात्यामध्ये भरणा केला आहे का? आदी गोष्टीची माहिती विचारली असता. त्यावेळी त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे देऊन खोटी माहिती सांगत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे स्विफ्ट कार क्रमांक एम एच 0२ सी झेड ८७७९ याचबरोबर ७२६० रुपये रोकड, पावती पुस्तके असे मुद्देमाल जप्त करून वरील चौघांवर लोणी पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम ३४, ४२०, ४६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास लोणी पोलीस करीत आहे.
अशा प्रकारचे अनेक घटना सायबर क्राईम, ऑनलाइन फसवणूक( कमी शिक्षण झालेले लोकांना मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांची फसवणूक केली जाते ) अशा प्रकारचे गुन्हे सध्या घडत आहे. यावर तातडीने पोलीस यंत्रणेने कारवाई केली पाहिजे.