13.4 C
New York
Sunday, October 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

केसापूर केटीवेअर बंधाऱ्याच्या पाण्याचे जलपूजन खा.तनपुरे यांच्या हस्ते 

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यातील केसापुर केटीवेअर बंधाऱ्याच्या पाण्याचे पूजन करताना मा.खा.प्रसाद तनपुरे कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते .जननेच्या आपण केलेल्या कामाचे चीज पैशाने होत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाने होते. 

या प्रसंगी व्यक्त केले. प्रारंभी बंधाऱ्याच्या च्या अडविलेल्या पाण्याचे जलपुजन त्यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले. केसापूरबंधारा बांधण्यासठी अनेक अडचणी आल्या. परंतु आपण शासन दरबारी युद्ध पातळीवर प्रयत्न करत येथे केटीवेअर बांधला. कारण येथे बंधाऱ्याची साईट चांगली होती व येथे गुप्त नदी आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की, आपल्या काळात आपण राहुरी, तालुक्यात सात केटीवेअर बांधून त्या परिसरातील भाग सुजलाम सुफलाम केला. जन्मभर साथ देईल केटी वेअर तुम्ही सांभाळा, परंतू आता समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे भविष्यात आपणास हक्काचे पाण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन हक्काची मागणी करावी लागणार आहे, असे सांगितले.

यावेळी बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी जीव धोक्यात घालून फळ्या टाकण्याचे काम करणारे शिवाजी रोडे, नितिन कोळसे, दतात्रय कोळसे,अच्युत जाधव यांचा तसेच पत्रकारांचा तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ पवार, प्रेरणा पतसंस्थेचे सुरेशराव वाबळे, माजी संचालक, शिवाजीराव कोळसे, ज्ञानेश्वर कोळसे, द्वारकानाथ बडघे, मा. सभापती वेणुनाथ कोतकर, रविंद्र आढाव, सुरेश निमसे, सुभाष डुकरे, बाळासाहेब गाडे, चेअरमन सतिष जाधव, कर्मयोगी पतसंस्थेच रविंद्र खटोड, शिवसेना अध्यक्ष लखन भंगत ज्ञानदेव भगत, सोमनाथ वाकडे, मा. सरपंच बाबासाहेब पवार, कुंडलीक खपके, युवराज जोशी, विलास टाकसाळ, प्रकाश राजुळे, संजय कोळसे, अण्णा शिंदे ,चांगदेव महाडिक ,बापूराव जाधव ,संजय पुजारी यांच्यासह पाटबंधारे खात्याचे अधिकारी लाभदायक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!