18.3 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

दर्शना पवार तिच्या हत्येचा मुख्य संशयित आरोपी राहुल हंडोरे हा मुंबईत अटक

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा):- कोपरगाव येथील एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात सहावी आलेली दर्शना  पवार हिचा वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. तिचा घातपात की खून झाला याची शोध पोलीस घेत होते. परंतु दर्शनाच्या पोलीस पोस्टमार्टम नुसार तिचा खून झाल्याचे निष्पन्न झालं होतं. यानंतर तिच्या सोबत असलेला तिचा मित्र राहुल हंडोरे हा बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्यावर मुख्य आरोपी म्हणून संशय होता. गेल्या चार दिवसापासून राहुल हंडोरे बेपत्ता होता. परंतु काल त्याला मुंबई येथे अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे यांनी  दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली.दर्शनाशी विवाह करण्याची इच्छा राहुलची होती. एमपीसी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी दर्शनाचा दुसऱ्या एका मुलासोबत विवाह ठरवला होता. त्यानंतर ‘मला वेळ द्या ‘अशी विनंती राहुलने तिच्या घरच्यांना केली होती. पण घरच्यांनी नकार दिला.

 राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहावा  क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्या अंगावर जखमा आढळल्यानं तिचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. परीक्षेतील यशानंतर सत्कारासाठी दर्शना पुण्यात आली अन्.; अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितलाघटनाक्रम
दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासह १२ जून रोजी राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. दोघेही दुचाकीवरुन तिथं दाखल झाले होते.
 सकाळीच्या १० च्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याचं एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. तेव्हापासून राहुल हांडोरे गायब होता.वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता बागवे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या वृत्तानुसार गायब असलेल्या राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता. 
पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाले. त्यानंतर कसलिही माहिती न दे त्यानं फोन बंद केला होता. त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं.

 दर्शना पवार ही खूप कष्टाळू व हुशार मुलगी होती. तिचे वडील सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरीला होते. तिने आपल्या स्वतःच्या हिमतीवर एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवले होते. दर्शना पवार हिच्या घातपात झाला की खून झाला या प्रकरणाची चौकशी ही तात्काळ व्हावी याकरिता खा. सुप्रिया सुळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन व भेट घेऊन या प्रकरणाची तातडीने कारवाई व्हावी.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!