नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- महाराजस्व अभियाना अंतर्गत चव्हाण वस्ती ते जुने गावठाण चिंचबन हा नकाशावरील दोन सलग रेषेचा रस्ता अनेक वर्षांपासून बंद पडलेला महसूल प्रशासनाने या रस्त्यावरील वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या शेतकरी ,नागरीकांच्या कुटुंबाच्या दैनंदिन येण्या जाण्यासाठी खुला करून दिल्याने या वस्यावरील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून करुन महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
अनेक वर्षापासून प्रलंबित रस्त्याचा प्रश्न महसूल प्रशासनाने सोडविला
एकीकडे रस्त्यासाठी नागरीक , शेतकरी महसूल प्रशासनाकडे तक्रारी करतात, न्यायालयातही मोठ्या प्रमाणात दावे दाखल करतात,रस्त्यासाठी प्रसंगी हाणामाऱ्या होतात परस्पर विरोधी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करतात तर रस्त्याच्या वादातून खुन देखील झाले आहेत याचे प्रमाण मोठे आहे .जर सर्वानी समजुतदार पणा दाखवत एकमेकांना सहकार्य करुन रस्ते खुले केले तर त्यांचाच हा त्रास कमी होणार आहे.
महसूल प्रशासनाचे उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नव्यानेच रुजु झालेले तहसीलदार बिरादार मंडलाधिकारी अनिल गव्हाणे कामगार तलाठी गणेश भुमरे व कोतवाल बाळासाहेब चौधरी यांनी महाराजस्व अभियाना अंतर्गत चव्हाण वस्ती ते जुने गावठाण चिंचबन रस्ता उत्तरेकडील गट नं १८ १९ व २१ तसेच दक्षिणेकडील ४४ , ४५ , ४७ या गटाच्या मधुन जाणारा पूर्वेकडून पश्चिमेकडे १ कि मी रस्ता अनेक वर्षांपासून बंद असलेल्या रस्त्यावरील शेतकरी व नागरीकांशी हा रस्ता खुला होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले असता ह्या रस्त्याचा प्रश्न कुठलेही वाद न होता शेतकऱ्यांच्या सहमतीने सुटला आहे .
हा रस्ता खुला झाल्याने आम्हाला आमच्या शेतमालाची वाहतुक करणे सोपे झाले आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहचता येईल आजारी व्यक्तींना वेळेत औषधोपचार होतील पावसाळ्यात आमचे खुप हाल होत होते .तहसिलदार, मंडलाधिकारी कामगार तलाठी कोतवाल यांनी सर्वांशी संवाद साधून समतीने हा रस्ता खुला केल्या बद्दल त्यांचे आभार .
प्रमोद चव्हाण ( शेतकरी )