शिर्डी दि.२२( जनता आवाज वृत्तसेवा ):-केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान कार्ड योजनेचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये कॅम्पचे आयोजन करण्याच्या सूचना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.या योजनेत सर्वाधिक नोंदणी करून जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आलेली आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना सरकारने सर्वच समाजघटकांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेद्वारा पाच लाख पर्यतचे उपचार केले जातात याच योजनेला अनुसरून राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली होती.या दोन्ही योजनांचे एकत्रिकरण करून राज्य सरकारने एकच आयुष्यमान कार्ड देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.या योजनेची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरू करण्यात आली असून नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावोगावी आरोग्य विभागाच्या वतीने कॅम्पच्या माध्यमातून लाभार्थीची नोंदणी करण्यात येत असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे १४ लाख ८२ हजार ६६२ इतके लाभार्थी असून,महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे १७लाख ८२ हजार ४५३लाभार्थी असल्याने एकूण ३१ लाख ६५ हजार नागरिकांना आयुष्यमान कार्ड वाटप करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
मागील तीन महीन्यात ६लाख ३९ हजार कार्ड काढण्यात आले असून,नगर जिल्ह्यायाने यामध्ये घेतलेली आघाडी राज्यात सर्वाधिक असल्याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की योजनेचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थाची मदत आता घेतली जाणार असून शाळा महाविद्यालयात कॅप्प लावून योजनेचा प्रसार आणि प्रचार करावा तसेच योजने बाबत विद्यार्थ्यामार्फत माहीती पोहचविण्याच्या दृष्टिने आरोग्य विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. असल्याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की योजनेचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थाची मदत आता घेतली जाणार असून शाळा महाविद्यालयात कॅप्प लावून योजनेचा प्रसार आणि प्रचार करावा तसेच योजने बाबत विद्यार्थ्यामार्फत माहीती पोहचविण्याच्या दृष्टिने आरोग्य विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.