कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ):- कोल्हार-भगवतीपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेस खांदे परिवाराकडून एक हजार लिटर्सच्या ४ पाण्याच्या टाक्या रयतच्या न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य नंदकुमार खांदे मामा यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आल्या व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
नंदकुमार खांदे यांनी सामाजिक कृतीतून पुढील पिढीस योग्य असा मार्ग दाखविला आहे. गेल्या वीस वर्षापासून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी आहेत. तसेच देवालय ट्रस्ट व विविध सहकारी संस्थांची पदे त्यांनी भूषविली आहे. त्यांच्या सत्काराप्रसंगी रयत न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी त्यांच्या योगदानाचे विविध पैलू सांगितले. स्व.मारूतराव खांदे मामाच्या नंतर त्यांनी सामाजिक व कौटुंबिक वारसा निर्विवादपणे चालविला. व कोल्हार भगवतीपुरच्या विकसनशील वाटचालीत व घडामोडी खांदे परिवाराचे मोठे योगदान आहे. भगवती देवीच्या जीर्णोद्धार कार्यातही सिंहाचा वाटा या कुटुंबीयांनी उचलला आहे. विकास कामात शंकरनाना खर्डे पाटील यांना निस्वार्थपणे साथ दिली.
स्व.मारूतराव खांदे मामाचा प्रत्येक धार्मिक, सामाजिक कार्यात पुढाकार असायचा. त्यांचा वारसा मितभाषी व सुस्वभावी असलेल्या नंदकुमार खांदे यांनी पुढे चालविला.असे ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रास्ताविक पत्रकार संजय कोळसे यांनी केले. जेष्ठ मार्गदर्शक अशोकराव आसावा यांनी आपल्या वर्गमित्रा बद्दल व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल विशेष गौरवोद्गार काढले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य सुधीर वाघमारे, पर्यवेक्षिका संजीवनी आंधळे, देवालय ट्रस्टचे विश्वस्त विजय निबे, संपत कापसे, स्थानिक स्कूल समितीचे सदस्य अजित मोरे, रमेश निबे, पांडुरंग देवकर, राजेंद्र लक्ष्मण खर्डे, संजय शिंगवी, दादासाहेब खर्डे, पंढरीनाथ खर्डे, बी. के. खर्डे, शरद खर्डे, राजेंद्र राऊत, राजेंद्र गाढे, अनिल खांदे, विशाल खांदे, हर्षल खांदे, निलेश खर्डे, दिलीप बोरुडे, दिलीप शेळके, अरुण फोपसे, अक्षय मोरे,मगर सर,नवाळे सर आदी उपस्थित होते. नितीनराव खांदे व ऋषिकेश खांदे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन शब्बीर शेख सर यांनी केले.