19.1 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

व्यापाऱ्याला लुटणारे दोघे गजाआड;एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त;श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई

श्रीरामपूर ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-श्रीरामपूरातील टिळकनगर येथे दुचाकी अडवुन चाकुचा धाक दाखवत व्यापाऱ्यास लुटणाऱ्या सराईत आरोपींना जेरबंद करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे.
रईस शेरखान पठाण (वय २८, रा. टिळकनगर), रोहित सोपान रामटेके (वय ३१, रां. रांजणखोल) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी आणखी एका अनोळखी साथीदारसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून १२ ग्रॅम वजनाची ७० हजाराची सोन्याची साखळी, २० हजार रुपये रोख रक्कम, १० हजाराचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकुण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,व्यापारी बाळकृष्ण गोविंद खोसे (वय ६४, रा. खोसे वस्ती, बेलापूर चौक, कोल्हार रोड) हे रविवार (दि.१८) सकाळी ११ वाजता त्यांचा जुना ग्राहक प्रशांत डांगे (रा. राहाता) यांच्याकडुन उधारीचे पैसे आणण्यासाठी मोटारसायकलवर राहाता येथे गेले होते. डांगे हे भेटले नाही, म्हणुन ते पुन्हा राहाता येथुन गणेशनगर, वाकडी मार्गे दत्तनगर येथे आले व नेहमी प्रमाणे टिळकनगर कारखान्याचे पाठीमागुन एकलहरे मार्गे बेलापूरकडे जाण्यास निघाले. टिळकनगर येथील रांजनखोल चौकात दुपारी २ वाजेच्या सुमारास आले व चौकातुन पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर अचानक दोन इसम त्याच्या मोटारसायकला आडवे झाले.त्यातील एका इसमाने त्याच्या हातातील चाकु दाखवुन त्यांना धमकावुन त्यांना एकलहरेकडे जाणारे रोडने घेवुन जात रांजनखोल शिवारात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साळुंखे वस्ती समोर मोटारसायकल बाजुला घेऊन थांबायला सांगितले.मोटारसायकल थांबवताच त्यांनी चाकुचा धाक दाखवुन पॅन्टच्या त्यांच्या खिशातील २० हजार रुपये तसेच गळ्यातील सोन्याची साखळी व एक विवो कंपनीचा मोबाईल काढुन घेत मारहाण केली. त्यावेळी खोसे यांनी आराओरडा केल्याने ते दोघेही मोटारसायकलवर पळुन गेले.याबाबत खोसे यांच्या फिर्यादी वरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास पथकाने गुप्त बातमीदार व सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे चोरटयांचा शोध घेतला असता संशयित इसम रईस शेरखान पठाण, रोहित सोपान रामटेके व त्याचा एक अनोळखी साथिदार यांनी सदरचा गुन्हा केल्याची व सध्या ते टिळकनगर परिसरात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.सदर परिसरात पोलिसांनी सापळा लावुन या दोन्ही आरोपींना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली. त्याच्याकडुन चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरिक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरिक्षक जिवन बोरसे, पो.ना. रघुनाथ कारखेले, पो.ना. रामेश्वर ढोकणे, पो.कॉ. राहुल नरवडे, पो. कॉ. गौतम लगड, पो. कॉ. रमिझराजा अत्तार, पो. कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. मच्छिद्र कातखडे, पो.कॉ. संभाजी खरात तसेच पो.ना. सचिन धनाड, पो. कॉ. प्रमोद जाधव व पो.कॉ. आकाश भैरट यांनी केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक देवरे करीत आहेत.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!