नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- गुणवत्तेच्या बाबतीत नेहमी पुढे असणाऱ्या नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट या विभागातर्फे आयोजित ‘कॅम्पस ड्राईव्ह’ येत्या २८ डिसेंबरला होणार असून अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी यासाठी पात्र असतील. अहमदनगर मधील इपिटॉम कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड आणि क्लासिक व्हील्स अहमदनगर ही कंपनी इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन आणि मेकॅनिकल या शाखांसाठी तसेच किरण अकॅडमी पुणे ही कंपनी इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन आणि मेकॅनिकल या शाखांबरोबर कम्प्युटर या शाखेतील विद्यार्थ्यांच्या देखील मुलाखती घेणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय. आर. खर्डे सर यांनी दिली. या तीन नामांकित कंपन्या विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया द्वारे मुलाखत घेऊन जे विद्यार्थी ही प्रक्रिया पूर्ण करून पात्र ठरतील अशा विद्यार्थ्यांना या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत.
महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. एस. एम. वाळके यांनी या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे नियोजन केले असून विद्यार्थ्यांना या मुलाखतीच्या पात्रतेसाठी लागणारे गुण, आवश्यक कागदपत्रे आणि मुलाखती दरम्यान होणाऱ्या लेखी आणि तोंडी परीक्षा कशा पद्धतीने होणार आहेत, याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट या विभागाने महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये असे निवडले जातील याविषयी पुढील काही दिवसांमध्ये नियोजनबद्ध तयारी केली आहे. तरी या कॅम्पस ड्राईव्हसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे सर, सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुलाखतीला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.