मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- आज सकाळी केंद्रीय प्रवर्तन निर्देशालय ( ईडी ) कडून मुंबई महापालिकेच्या 12 हजार 500 कोटींच्या कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आज ईडीने मुंबईत 16 हून अधिक ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिकेच्या 12 हजार 500 कोटींच्या कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आज ईडीने मुंबईत 16 हून अधिक ठिकाणी छापेमारी
यात सर्वात चर्चेतील नाव आहे ते सूरज चव्हाण.ठाकरे गटाचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे अंत्यत निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांच्या घरी सकाळी 8 वाजताच ईडीच्या पथकाने छापा टाकला.
सुरज चव्हाण हे नगरसेवक, आमदार, खासदार काहीही नसताना कोविड सेंटर घोटाळ्यात त्यांचे नाव का घेतले जात आहे. याचे गुढ अद्याप समजले नाही .
शिवसेना व बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर कार्यकर्ता अशी सूरज चव्हाण यांची ओळख आहे. सर्वप्रथम वरळीतील शिवसेनेच्या शाखेपासून त्यांनी कामाला सुरूवात केली. त्यानंतर शिवसेना भवन व मातोश्री असा त्यांचा प्रवास आहे. आदित्य ठाकरेंनी युवा सेनेची स्थापन केल्यानंतर त्यांनी स्वत:ला युवा सेनेच्या कामात स्वत:ला झोकून घेतले.
कोरोना काळात वरळीत मोठे काम
कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली वरळीत मोठे काम केले. वरळीत कोविड सेंटर, मदत कॅम्प उभारण्यात सूरज चव्हाण यांचा मोठा वाटायचा. कोरोना काळात आदित्य ठाकरे यांनी कुणाला मदत करण्यासंदर्भात काही ट्विट केले तर संबंधितांना ती मदत करण्याची जबाबदारी सूरज चव्हाण यांच्यावरच असायची. त्यामुळे याच काळाच सूरज हे अत्यंत विश्वासू आहेत.याशिवाय मुंबईतील लोकसभा व विधानसभांचा सूरज चव्हाण यांचा दांडगा अभ्यास असल्याचे म्हटले जाते. कोणत्या मतदारसंघात सध्या काय स्थिती आहे? कोणाकडे किती मते आहेत?, याची आकडेवारी त्यांना तोंडपाठ असायची. मुंबई विद्यापाठीच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेने दहाच्या दहा जागा जिंकल्या होत्या. यामागे सूरज चव्हाण यांचीच रणनिती होती. अभ्यास व निष्ठा या दोन्ही गोष्टींमुळे ते आदित्य ठाकरेंच्या गटात अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर असे मातब्बर असतानाही आदित्य ठाकरेंच्या आग्रहामुळे सूरज चव्हाण यांना उद्धव ठाकरेंनी ठाकरे गटाचे सचिव बनवले.यामुळे ठाकरे गट यांच्यामध्ये अंतर्गत गट तट राजकारण होत नाही ना.
कोरोना काळात अनेक कंपन्यांना सूरज चव्हाण यांच्या मध्यस्थीनेच कोविड सेंटरचे काम मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच, ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनाही त्यांनी येथे काम मिळून दिले. या सर्वात काही गैरव्यवहार झाला आहे का?, याचा तपास आता ईडी करत आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील कारभाराची कॅगमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. कोरोना काळात मुंबई पालिकेने दिलेल्या कंत्राटांची चौकशी कॅगने केली. यासंदर्भात कॅगने दिलेल्या अहवालात
कोविड काळात मुंबई महापालिकेत 12 हजार 500 कोटींचा घोटाळा झाला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी SITचीही स्थापना केली आहे.
महाराष्ट्रामध्ये आजचे झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर युती व महाविकास आघाडीमध्ये या कारणामुळे टोकाचा संघर्ष पहावस मिळू शकतो.