9.9 C
New York
Thursday, November 28, 2024

Buy now

spot_img
spot_img

लोणीत मंगळवार पासून महीला बचतगटांसाठी स्वयंसिध्दा याञा २०२३ चे आयोजन   महीला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुचे प्रदर्शन- विक्री, खाद्य महोत्सव,पशु-पक्षी प्रदर्शन

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जनसेवा फाऊंडेशन, लोणी, पंचायत समिती, राहाता आणि कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषि विभाग, पशुसंसंवर्धन विभाग,आत्मा अहमदनगर यांच्या वतीने मंगळवार दि. २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळावधीमध्ये राहाता तालुकास्तरीय सक्षम महीला महोत्सव अर्थात स्वयंसिध्दा याञा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये महीला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुचे प्रदर्शन- विक्री, खाद्य महोत्सव,पशु-पक्षी प्रदर्शन आणि कृषि विषयक माहीतीचा समावेश असणार आहे अशी माहीती जनसेवा फौंडेशनचे सचिव डॉ. हरीभाऊ आहेर यांनी दिली.

राज्याचे महसूल,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास तथा पालकमंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील,प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ.राजेंद्र विखे पाटील आणि रणरागिनणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित आणि जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ,शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,जिल्हा ग्रामीण विकास यंञणेचे प्रकल्प संचालक सुनिलकुमार पठारे,जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप,शिर्डीचे प्रांतअधिकारी माणिक आहेर,राहात्याचे तहसिलदार अमोल मोरे, आदीच्या उपस्थित गुरुवारी सकाळी १०:३० वाजता होणार आहे.

स्वयंसिद्धा याञा २०२३ या महीला बचत गटांसह संपूर्ण जिल्हासाठी पर्वणी ठरवावी असे नियोजन करण्यात आले आहे. लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या पद्मभूषण डॉ. बाळसाहेब विखे पाटील क्रिडा संकुलच्या प्रांगणात डिडशे ते दोनशे स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.सकाळी ९ ते रात्री १० या काळावधीत बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तु, खाद्य महोत्सव, कृषिविषयक माहीती, शेती अवजारे आदींची माहीती एकाच वेळी या ठिकाणी मिळणार आहे.याशिवाय मंगळवारी दुपारी डाॅग शो,बुधवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ७ ते ८ यावेळेत प्रवरेच्या विद्यार्थ्याचा सास्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

स्वयंसिद्धा यात्रा २०२३ यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहान आत्माचे प्रकल्प संचालक विलास नलगे,जिल्हा कृषि अधिक्षक सुधाकर बोराळे,जिल्हा फशुसंवर्धन अधिकारी डाॅ.दशरथ दिघे,फशुसंवर्धन अधिकारी डाॅ.सुनिल तुंबारे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालींदर पठारे, कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वरचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख,तालुका कृषि अधिकारी आबासाहेब भोरे,, लोणी बुद्रुकच्या सरपंच कल्पना मैड प्रकल्प संचालिका रूपाली लोढे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!