लोणी दि.२४ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात न पडता निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्राला मिळवून द्यायचे हेच ध्येय आपले होते.यासाठी महायुती सरकार सतेवर यावे लागले पाणी आल्याचा आनंदादयी क्षण पाहाण्यासाठी आज खासदार बाळासाहेब विखे पाटील आपल्यात असायला हवे होते असे भावनिक उद्गार महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काढले.
मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत गोगलगाव लोणी खुर्द गावातील तळ्यांमध्ये आलेल्या निळवंडे पाण्याचे पूजन करण्यात आले.या ऐतिहासिक क्षणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांची ग्रामस्थांनी मिरवणूक काढून नागरी सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हाणाले की लोकांच्या चेहर्यावरचा आनंद दिसत आहे.एखादे धरण पूर्ण होणे आणी लाभक्षेत्राला पाणी मिळणे ही खूप मोठी गोष्ट घडली आहे.पण मागील विधानसभेला सांगितले होते की निळवंडे धरणाचे पाणी आले तरच मत मागायला येईल.अजून विधानसभा निवडणुक लांब आहे.पण राजकीय टिका टिपणीत न पडता मागील युती सरकारमध्ये पहील्या २२ किलोमीटर अंतरावरील कालव्यांची काम सुरू झाली.कालव्यात पाणी येण्यासाठी सुध्दा राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सतेवर यावे लागले असे विखे पाटील म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या धरणाच्या लोकार्पणासाठी आले.तो आपल्यासाठी ऐतिहासिक झाली.ठरला असल्याचे नमूद करून मंत्री विखे पाटील म्हणाले की अजून खूप आपल्याला करायचे आहे.राज्य सरकारने पाच हजार कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिल्याने निधीची कमतरता नाही.पण केंद्र सरकारच्या निधीची मदत आपल्याला मिळेल असा विश्वास व्यक्त करतानाच या विषयावरून मोठे राजकारण झाले.केवळ विखे पाटील यांची जाणीवपुर्वक बदनामी केली.परंतू पाणी कालव्यात आल्यानंतर सर्वाना प्रश्नाची उतर मिळाली.धरणाच्या मुखापाशी काम सुरू नव्हती पण आंदोलन इकडेच सुरू होती.या कामाचे श्रैय कोणाला घ्यायचे त्यांना जरूर घेवू द्यावे आपल्याला कोणताही श्रेयवाद करायचा नाही असे स्पष्ट करून विखे पाटील म्हणाले की अधिकार्यांनी चांगले नियोजन केले त्यामुळेच सर्व गावंना पाणी मिळू शकले.चार्यांची काम काही ठिकाणी सुरू व्हायची आहेत.पण शेवटच्या शेतकऱ्याला पाणी देण्यात कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली
याप्रसंगी महानंदाचे चेअरमन राजेश परजणे बापुसाहेब आहेर बाळासाहेब आहेर संजय आहेर संतोष ब्राम्हणे कारभारी आहेर दादासाहेब घोगर धनंजय आहेर संतोष ब्राम्हणे हरीभाऊ आहेर शरद आहेर मनोज वाघ बाळासाहेब गोर्डे सारंगधर दुशिंग संतोष माघाडे भाऊसाहेब खाडे माणिक गोर्डे योगेश महाराज कांदळकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.