अहमदनगर (जनता आवाज वृत्तसेवा):- अहमदनगर कोतवाली पोलीस स्टेशन ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याची तक्रार केल्याच्या कारणावरून शहरातील बालिकाश्रम रोडवर सोमवारी मध्यरात्री तलवारीने वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला. तर त्याचा मित्र या हल्ल्यात जखमी झाला आहे. पोलिसांनी अवैध धंद्यांची माहिती देत असल्याच्या संशयावरून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. बालिकाश्रम रोडवर वाढदिवसाची पार्टी सुरू असताना ही घटना घडली. ओंकार ऊर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय 24, रा. पांचपीर चावडी, माळीवाडा) यामध्ये ठार झाला. शुभम पाडोळे हा जखमी झाला आहे. पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री घडल्याने नगर शहर पुन्हा हादरले आहे. या प्रकारच्या घटनेमुळे नगर शहर मध्ये घबराटीचे व दहशतीचे वातावरण आहे.
काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर रूबाब कलेक्शन समोर ही घटना घडली. या प्रकरणी तिघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार रमेश घोलप (रा. माणिक चौक) यांनी फिर्याद दिली आहे. गणेश केरुप्पा हुच्चे, नंदु बोराटे व संदिप गुडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.