नगर ( जनता आवाज वृत्तसेवा):- दत्त जयंती निमित्त श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने नगरशहरातुन भव्य पालखी मिरवुणक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत युवक आणि महिलांचा मोठा सहभाग होता.
प्रतिष्ठाच्या सर्व पुरुष कार्यकर्त्यांनी एक सारखे शर्ट आणि महिलांनी एक सारख्या साड्या परिधान करुन नगरकरांचे लक्ष वेधले. मिरवणुक मार्गावर रांगोळी काढण्यात आली. मिरवणुकीत 500 महिला व पुरुषांचा सहभाग होता. या श्री दत्त पालखीचे ठिक ठिकाणी स्वागत करुन भाविकांनी दर्शन घेतले.
दत्त जयंती निमित्त दत्त कॉलनी, दातरंगे मळा येथील श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर मंदिरात सकाळी महाअभिषेक व होमहवन करण्यात आले. त्यानंतर पालीखची महापुजा करुन भव्य पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी सर्वत्र पालखीचे स्वागत भावकांनी केले. या पालखली मिरवणुकीत लेझिम खेळ तसेच बाल वारकरी मिरवणुकीची शोभा वाढवत होते. त्यामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
ही शोभायात्रा दातरंगे मळा, दिल्लीगेट, नवरंग व्यायाम शाळा रोड, शितळे देवी मंदिर रोड, बागडपट्टी रोड, नेता सुभाष चौक, नवीपेठ, कापड बाजार, अर्बन बँक चौक, मार्कंडेय मंदिर, गांधी मैदान, चितळे रोड, चौपाटी कारंजा, नालेगांव, वाघगल्ली, पुन्हा दातरंगे मळा या प्रमुख मार्गावरुन बॅण्ड पथक, ढोल पथक, लेझिम यांच्यासह निधाली. या शोभायात्रामुळे नगरशहरात भक्तीमय वातावरण निमार्ण झाले होते.
दत्त जयंती निमित्त श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने 5 दिवसापासुन विविध कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबीर, भजन संध्या, गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप, लहान मुलांसाठी हस्य मनोरंजन कार्यक्रम, डान्स स्पर्धा, आर.जे.प्रसन्न रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, जादूचे प्रयोग, होम मिनिस्टर, सामुदायिक विवाह सोहळा असे उपक्रम राबविण्यात आल्या माहिती प्रतिष्ठानचे श्रीनिवास इपलपेल्ली यांनी दिली.
पालखी मिरवणुक व विविध कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान व निलाबंरी महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.