18 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणूक करावी , मढी येथे ग्रामसभेत घेण्यात आला ठराव .

पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- पाथर्डी तालुक्यातील भटक्या समाजाची पंढरी म्हणून समजली जाणारी मढी देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी मंदिरासमोरच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत हाणामारी केल्याने ग्रामस्थ व नाथभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून चांगल्या प्रशासकाची नेमणूक करावी. असा ठराव मढी येथे बुधवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला.

विश्वस्त मंडळाच्या कारभारावर जाहीर नाराजी नोंदवीत आवाजी पद्धतीने हा ठराव घेण्यात आला. मढी देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, माजी अध्यक्ष सचिन मरकड, माजी विश्वस्त उत्तम मरकड, दीपक साळवे, फिरोज शेख, परसराम मरकड आदी ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला.

देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड म्हणाले की, मढी गावचा सरपंच असून मढी देवस्थानचा अध्यक्ष आहे. दानपेटी मधील पैशांची या विश्वस्त मंडळांनी अपरातफर केली आहे. भ्रष्टाचार मी उघड करेल अशा भीतीने माझ्यावर जीवघेणा हल्ला करून मला संपवण्याचा प्रयत्न होता.

नाथ पूजा विधीचा मान सुरुवातीपासूनच मरकड कुटुंबीयांना आहे. विश्वस्त मंडळांनी घटनेत बदल करून मरकड कुटुंबातील सहा व इतर पाच विश्वस्त मढी गावातील घेतले पाहिजे, अशी मागणी अनेक ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणुकीची सूचना सचिन मरकड यांनी मांडली अनुमोदन दीपक साळवे यांनी दिले.

देवस्थानसह कुटुंबाची बदनामी मढी देवस्थान येथे झालेल्याहाणामारीमुळे न्यास व मरकड कुटुंबीयांची मोठी बदनामी झाली. विश्वस्त पदासाठी व अध्यक्षपदासाठी हाणामाऱ्या करणाऱ्या विश्वस्तांना देवस्थानचा कारभार पाहण्याचा अधिकार नाही.

ग्रामसभेचा ठराव घेऊन तात्काळ नगर व पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसात कारवाई न झाल्यास ग्रामस्थांना घेऊन नगर येथील धर्मादय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती सचिन मरकड यांनी दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!