23.8 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

आज मुंबईमध्ये ठाकरे गट व शिंदे गट यांचे शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करणार, आत्तापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा दोन वेगळे वर्धापन दिन

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा:- आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन आहे. याकरिता ठाकरे आणि शिंदे गटाचे वर्धापन दिनाचे मेळावे आज होत आहे. ठाकरे गट व शिंदे गट हे दोन्ही वेगवेगळे वर्धापन दिन साजरी करणार आहेत  ठाकरे गटाचा मेळावा किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. संध्याकाळी 5 नंतर या मेळाव्याला सुरुवात होईल. संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे यावेळी संबोधित करतील. काल वरळीच्या शिबीरातून भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या रडारवर कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांचं मुंबईत शक्तीप्रदर्शन होणार आहे. नेस्को सेंटरच्या भव्य प्रांगणात होणाऱ्या या मेळाव्याला हजारो शिवसैनिक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मेळाव्याला प्रत्येक जिल्ह्यातून 300 ते 400 शिवसैनिक आणण्याचं टार्गेट देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नेस्को सेंटरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर्स लावले आहेत. त्यावर काँग्रेससोबत कधीच युती करणार नाही असं लिहिलंय.
जागा कमी पडल्या तर तुम्ही राष्ट्रवादीला सोबत घेणार का? असा सवाल बाळासाहेबांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी नेव्हर… नेव्हर असं म्हटलं होतं. तो मजकूरही या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. तसेच स्टेजवर स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या स्क्रीनवरून उद्धव ठाकरे यांची जुनी भाषणे दाखवून त्यांना तोंडघशी पाडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाच्या कार्यक्रमालाही संध्याकाळी 5 नंतर सुरुवात होणार आहे.
 आजच्या होणाऱ्या वर्धापन दिन निमित्त ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज वर्धापन निमित्त आज हे काय बोलणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!