लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी या विद्यालयामध्ये माऊंट अबू (राजस्थान) येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ओमशांती सेंटरच्या ब्रम्हाकुमारी गीता बहेनजी यांनी जीवन जगण्याची कला या विषयावर विद्यार्थींनीना प्रबोधन केले.
यावेळी ब्रम्हाकुमारी गीता बहेनजी यांनी आपल्या जीवनात येणारा क्रोध, इर्षा, द्वेष या गोष्टींना थारा न देता सर्वांप्रती प्रेम ,शांती व आनंदाने जीवन कसे जगावे , आपले ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी तसेच आवश्यक त्या चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी सहजयोग साधना व मेडिटेशन करणे , त्याची आवश्यकता व महत्व याबाबत प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी लोणी बु येथील ओम शांती ब्रम्हकुमारी केंद्राच्या संचालिका बहेनजी आशा दिदी, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ लिलावती सरोदे, विद्यालयाच्या प्राचार्या- सौ भारती कुमकर,प्रा.अनिल लोंखडे आदीसह विद्यार्थ्यींनीं , सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.