श्रीगोंदा (जनता आवाज वृत्तसेवा ):-परिक्रमा शैक्षणिक संकुलनातील परिक्रमा सायन्स कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ.पांडुरंग आबासाहेब इथापे सर यांनी नुकतीच फिजिक्स या विषयाःतर्गत ” दि कम्पॕरेटिव्ह स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड कॕरक्टेरायझेशन ऑफ थीन फिल्म फॉर सोलर सेल अँड सेन्सर डिव्हायसेस फॉर मेटल आॕक्साईड सेमीकण्डक्टर्स ” या विषयात शोधनिबंध सादर करून विद्यापीठाची डॉक्टरेट ने ही पदवी संपादन केली.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ. पी ए इथापे सर यांचे मा.मंत्री. आमदार बबनरावजी पाचपुते परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते,सचिव विक्रमसिंह पाचपुते मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड.प्रतापसिंह पाचपुते,अकॅडमी डायरेक्टर सौ.इंद्रायणी पाचपुते,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पुंड,डे.अकॅडमी डायरेक्ट डॉ.संजीव कदम पाटील तसेच सर्व विभागांचे प्राचार्य , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.