9.3 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्राच्या विकासात साहित्याने महत्त्वाची भूमिका बजावली- सौ. शालिनीताई विखे पाटील 

सात्रळ, दि. १२( जनता आवाज वृत्तसेवा ) :- भारताची जनसंख्या बहुधर्मी, बहुजातीय, आणि बहुभाषी आहे. वर्तमान साहित्यात लोकतंत्रवादी मूल्ये स्थापित करण्याची प्रवृत्ती दिसून येते‌. देशातल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजनीतिक घटकावर साहित्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील सामाजिक आणि लोकतांत्रिक क्षेत्रात साहित्यिकारांची भूमिका आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्राच्या विकासात साहित्याने महत्त्वाची भूमिका सातत्याने बजावली असल्याचे मतप्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र हिंदी परिषद व पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदी साहित्याची सामाजिक आणि लोकतांत्रिक भूमिका : नवीन संदर्भ’ याविषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष प्रो. डॉ. जिजाबराव पाटील यांनी केले. प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. चर्चासत्राचे संयोजक व हिंदी विभागप्रमुख डॉ. भाऊसाहेब नवले राष्ट्रीय चर्चासत्र आयोजनामागील भूमिका विषद केली. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ चंद्रदेव कवडे यांनी महानगरीय जीवन शैलीचे विश्लेषण केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता मा. डॉ. मधुकर खराटे यांनी तसेच जयपुर राजस्थान येथील प्रसिद्ध लेखिका रजनी मोरवाल उद्घाटनपर मार्गदर्शन केले. बिजभाषण मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय मुरूमकर यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. श्री. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक ॲड. श्री. आप्पासाहेब दिघे पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रमेश पन्हाळे, आबासाहेब घोलप, रंगनाथ दिघे, जयवंत जोर्वेकर पाटील, सुभाष पाटील अंत्रे, बाळासाहेब दिघे पाटील, शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रो. डॉ.पांडुरंग पाटील, प्रधान सचिव डॉ. गजानन चव्हाण, तर चर्चासत्रासाठी साधन व्यक्ती म्हणून कवयित्री बहिणाबाई चोधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ. संजयकुमार शर्मा, प्रो. डॉ. मिथिलेश अवस्थी, नागपूर, प्रो. डॉ. अनिल काळे, नारायणगाव, पुणे, प्रो.डॉ. पंढरीनाथ पाटील शिवांश, उपाध्यक्ष, विश्व हिंदी संगठ्न, दिल्ली, डॉ. विठ्ठलसिंह ढाकरे, नाशिक, सोलापूर विद्यापीठाचे हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो.डॉ. अनिल साळुंखे, प्रो. डॉ. अरुण घोगरे, अमरावती, डॉ. देविदास बामणे, रायगड, प्रो. डॉ. बाबासाहेब कोकाटे, छत्रपति संभाजीनगर, प्रो.डॉ.सुरेश शेळके, औंढा, हिंगोली आदी अभ्यासक उपस्थित होते.

सौ. विखे पाटील पुढे म्हणाल्या की, “मार्गदर्शक अभ्यासक सेवानिवृत्त असले तरी मनाने तरुण आहेत. आज ३० वे अधिवेशन प्रवरा परिसरात, ग्रामीण भागात होत आहे. कृषिसंस्कृतीचे महत्त्व शिक्षणामध्ये वाढत आहे.” सदरच्या राष्ट्रीय चर्चासत्रात १८० अभ्यासकांनी नाव नोंदणी केली असून चर्चासत्रासाठी प्राप्त झालेले १४० शोधनिबंधांचे प्रकाशन ‘अक्षरा’ या यूजीसी केअर लिस्ट नियतकालिकातून दोन भागात प्रकाशित करण्यात आले.

याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि संशोधकांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबईचे कार्याध्यक्ष डॉ. शीतला प्रसाद दुबे, सहनिदेशक आणि अकादमीचे सदस्य सचिव, श्री. सचिन निंबाळकर, चर्चासत्राचे संयोजक व हिंदी विभागप्रमुख डॉ. भाऊसाहेब नवले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनंत केदार यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!