नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- मनाच्या एकाग्रतेमधून यशाची शिडी चढता येते, असे मत श्री शेखर देव यांनी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन अंतर्गत आयोजित ‘स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून मन त्याचे स्वरूप एकाग्रता आत्मविश्वास आणि यश’ या व्याख्यानातून व्यक्त केले . राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लाभलेले श्री शेखर देव यांनी मनाची एकाग्रता, यशाची परिभाषा, अभ्यासाला योगाची जोड, निश्चित विचारसरणी अशा वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांशी चर्चा करत स्वामी विवेकानंदांचे पुस्तके विद्यार्थ्यांनी नियमित वाचावीत याविषयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
१२ जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करत असतो. स्वामी विवेकानंदांचे पुस्तके वाचून त्यांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांनी अमलात आणावेत, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे सर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास महाविद्यालयामधून प्रा. पी. जी. निकम, प्रा. एस. एम. वाळके, प्रा. व्ही. व्ही. जगताप, प्रा. ए. बी. काळे, प्रा. एस.आर. पवार, प्रा. एम.के.भोसले, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. गिरीश पाटील, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अक्षय देखणे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. रुपेश दगदिया यांनी केले.