लोणी दि.१४( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्माभूषण डाँ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात पाच दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
महाविद्यालय व ग्लोबल टॅलेंट ट्रॅक, पुणे या मध्ये झालेल्या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून बारक्लेझ या कंपनीच्या मदतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या पाच दिवसीय कार्यशाळेसाठी श्री निलेश बोराडे हे प्रशिक्षक म्हणून लाभले होते. श्री बोराडे यांनी विद्यार्थी हा नोकरी साठी कसा तयार व्हावा, दैनंदिन उपक्रम, व्यक्तिमत्व विकास, मुलाखत तंत्रज्ञान, गट चर्चा, ई-मेल लिखाण, मुलाखत अर्ज तसेच मेडिकल कोडींग, फार्माकोविगीलन्स व क्लिनिकल ट्रायल्स इ. या सर्व मुद्द्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या पाच दिवसात काही प्रात्यक्षिक स्वरूपातही विद्यार्थ्यांना प्राशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा भविष्यात नोकरीसाठी होणार आहे.महाविद्यालयात स्वतंत्र स्किल डेव्हलोपमेंट विभाग कार्यरत असून या विभागंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण पाच दिवसीय कार्यशाळे मध्ये एकूण शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठीमहाविद्यालय स्किलडेव्हलोपमेंट विभाग प्रमुख सौ. मनीषा सोनवणे,ट्रैनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. सोमेश्वर मनकर , डॉ. संतोष दिघे, डॉ. सुहास सिद्धेश्वर आणि सर्व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन सौ मनीषा सोनावणे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मनकर यांनी केले.