कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा ):- कोल्हार बुद्रुक येथील मा.सैनिक संदिप भागवत मोरे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांची मंत्रालयीन क्लर्क म्हणून निवड झाली आहे. याबाबत चे नियुक्ती पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे.
संदीप मोरे हे भारतीय सैन्य दलात मराठा लाईट इन्फंट्री मध्ये भरती झाले होते. त्यांनी भारतीय सैन्यदलामध्ये २४ वर्षे देशसेवा केली. ३१ ऑक्टोबर २०२० ला निवृत्तीनंतर २०२१ची एमपीएससीची परीक्षा त्यांनी दिली. एमपीएससीमधून ग्रुप सी ची परीक्षा उत्तीर्ण होऊन नुकतीच त्यांची मंत्रालयीन क्लर्क म्हणून निवड झाली आहे. यासंदर्भातले नियुक्तीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले असून ८फेब्रुवारी२०२४ च्या अगोदर त्यांना आदिवासी विकास विभागात रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.१६जानेवारी पासून ते आदिवासी विकास विभागात रुजू होतील. भारतीय सैन्य दलातही विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. शेतकरी भागवत देवराम मोरे यांचे सुपुत्र असुन शेतकरी कुटुंबातील मुलांनी घेतलेली ही गरुड झेप नक्कीच पुढील पिढीस मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.