6.8 C
New York
Thursday, November 28, 2024

Buy now

spot_img
spot_img

ज्‍यांनी रामाला आणि हिंदुत्‍वाला सोडले त्‍यांना जनताही सोडल्‍याशिवाय राहणार नाही- महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

लोणी,( जनता आवाज वृत्तसेवा ):-हिंदुत्‍ववाद सोडून उध्‍दव ठाकरेंनी आपले आपले राजकीय अस्‍तित्‍व केव्‍हाच गमावले आहे. नाशिकच्‍या काळाराम मंदिरात येवून कितीही पायघड्या घालून आरत्‍या केल्‍या तरी, त्‍यांचा गैरसमज आता परमेश्‍वर दुर केल्‍याशिवाय राहणार नाही. ज्‍यांनी रामाला आणि हिंदुत्‍वाला सोडले त्‍यांना जनताही सोडल्‍याशिवाय राहणार नाही असा टोला महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी लगावला.

मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आपल्‍या लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात मकर संक्रांतीच्‍या निमित्‍ताने जिल्‍ह्यासह राज्‍यातून आलेल्‍या नागरीकांना तिळगुळ देवून शुभेच्‍छा दिल्‍या तसेच जनता दरबाराच्‍या माध्‍यमातून नागरीकांची निवेदन स्विकारत समस्‍या समजावून घेतल्‍या. अनेक प्रश्‍नांबाबत त्‍यांनी उपस्थित आधिका-यांना तातडीने कार्यवाही करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. नागरीकांना भेटत असतानाच ना.विखे पाटील यांनी माध्‍यमांशीही संवाद साधला. अनेक नेते कॉंग्रेस पक्ष सोडत आहेत. उध्‍दव ठाकरेंच्‍या पक्षातूनही अनेकजण बाहेर पडत आहेत. या प्रश्‍नावर बोलताना खरे तर आजाचा दिवस शुभेच्‍छा देण्‍याचा आहे पण राज्‍याच्‍या राजकीय ध्रुविकरणात आधिच अनेक लोकांवर संक्रांत आली आहे. कोणत्‍या पक्षावर संक्रांत येणार बघुयात असे सुचक वक्‍तव्‍य त्‍यांनी केले.

नाशिक येथे उध्‍दव ठाकरे यांनी आयोजित केलेल्‍या राम मंदिरातील आरतीच्‍या कार्यक्रमावर प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, मुळातच उध्‍दव ठाकरे यांनी आपल्‍या विचाराचे अस्तित्‍व गमावले आहे. हिंदु धर्माच्‍या विरोधात बोलणा-या तसेच प्रभू श्रीरामचंद्रांच्‍या बाबतीत अक्षेपार्ह वक्‍तव्‍य करणा-या नेत्‍यांच्‍या मांडीला मांडी लावून ते जावून बसतात, त्‍यांचा निषेध करण्‍याचे धाडसही ते दाखवू शकत नाहीत. त्‍यामुळे उध्‍दव ठाकरे आता कोणत्या हिंदुत्‍वाच्‍या गप्‍पा करतात असा प्रश्‍न पडतो. काळाराम मंदिरात येवून कितीही पायघड्या घातल्‍या आणि आरत्‍या केल्‍या तरी, ज्‍यांनी रामाला सोडले त्‍यांना जनता केव्‍हाच सोडून देईल असा टोलाही त्‍यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी मणीपुर पासून सुरु केलेल्‍या यात्रेबद्दल बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, यापुर्वी काढलेल्‍या यात्रेचे फलित काय मिळाले हे संपूर्ण देशाने पाहीले आहे. ते ज्‍या राज्‍यात यात्रा घेवून गेले तिथे त्‍यांच्‍या पक्षाचा पराभव झाला, आता दुस-यांदाही सुरु केलेल्‍या यात्रेचे फलित काय तर उरली सुरली राज्‍य आणि पक्षाचे अस्तित्‍वही ते गमावून बसणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

लोणी येथे नऊ वर्षिय बालकावर बिबट्याने केलेल्‍या हल्‍ल्‍याची घटना अतिशय दुर्दैवी असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या संदर्भात वनखात्‍याच्‍या आधिका-यांची आपण बैठक घेवून त्यांना सर्वतोपरी सुचना केल्‍या आहेत. मात्र बिबट्यांची संख्‍याच वाढत चालल्‍याने वनखात्‍याच्‍या मर्यादाही आता स्‍पष्‍ट होत आहेत. यासाठी आता राज्‍य सरकारने पुढाकार घेवून काही नियमांमध्‍ये बदल करण्‍याचा आग्रह केंद्र सरकारकडे धरला पाहीजे. वाघांसाठी असलेले नियमच बिबट्यांनाही लागू करण्‍यात आल्‍याने वनखात्‍यावरही काही बंधन आहेत. याबाबत प्रामुख्‍याने विचार करण्‍याची गरज आता निर्माण झाली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

शिर्डी लोकसभा मतदार संघाबाबत बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, जिल्‍ह्यातील दोन्‍हीही जागा भारतीय जनता पक्ष जिंकुन आणेल यात कोणताही संदेह नाही, परंतू याबाबतीत पक्षाचे वरिष्‍ठ नेते निर्णय करतील असे त्‍यांनी एका प्रश्‍नाच्‍या उत्‍तरात सांगितले.

संक्रांतीच्‍या निमित्‍ताने सामुहिकपणे सर्वांना तिळगुळ देवून शुभेच्‍छा देण्‍याची परंपरा लोकनेते खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरु केली होती. सक्रांत असो की विजयादशमी या दोन्‍हीही दिवशी असंख्‍य लोक त्‍यांना भेटायला येत. हीच परंपरा आम्‍ही पुढे घेवून जात आहोत. संक्रांतीच्‍या निमित्‍ताने आज सर्वांना तिळगुळ देवून सर्वांच्‍या शुभेच्‍छा स्विकारत आहे. जेष्‍ठांचे आशिर्वादही मिळत आहेत. या दिवसा एक वेगळा आनंद असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!