16.4 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

बिबट्यांच्या शोधासाठी वन विभागाच्या ड्रोन टिम कार्यरत करणार-ना.विखे पाटील अथर्व लहामगेचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी ; कुटूबियांची घेतली भेट 

लोणी दि.१५( जनता आवाज  वृत्तसेवा):- बिबट्याच्या ह्ल्ल्यात अथर्व लहामगे याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असून,बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.परंतू परीसरातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वन विभागाची ड्रोण टिम पुढील काही दिवस बिबट्यांचा शोध घेण्यासाठी कार्यरत राहाणार असल्याची माहीती महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

अथर्व लहामगे या नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला.या ह्ल्ल्यात अर्थवचा मृत्यू झाला.मंत्री विखे पाटील यांनी वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत लहामगे कुटूबियांची भेट घेवून त्यांना दिलासा दिला.तसेच अथर्वर हल्ला झालेल्या ठिकाणाची पाहाणी केली.

शासनाच्या स्थायी आदेशा प्रमाणे लहामगे परीवाराला शासनाच्या वतीने २५लाख रूपयांची मदत करण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.लहामगे कुटूबियांचे झालेले नूकसान भरून न येणारे आहै.या संकटात आम्ही सर्वजण त्यांच्या समवेत असल्याचे त्यांनी कुटूंबाला दिलासा देताना सांगितले.

लोणी आणि परीसरच नव्हे तर जिल्ह्याच्या अन्य भागातही बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.वन विभाग प्रयत्न करीत आहे. पण बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अन्यही यंत्रणाचा उपयोग आता करावा लागणार असून यासाठी विभागाची ड्रोन टिम या भागात आणि अन्य काही ठिकाणी सक्रीय करून बिबिट्याचा रहीवास असलेली ठिकाण शोधून काढण्यासाठी प्रयत्न करणार असून तशा सुचनाही विभागाला देण्यात आल्या असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.याप्रसंगी जिल्ह्याच्या उपवन संरक्षक सुवर्णा माने प्रांताधिकारी माणिक आहेर तहसिलदार अमोल मोरे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!