शिर्डी: विद्युत रोहित्र वर चढलेल्या माथेफिरूला सुखरुप खाली
उतरवण्यात अग्नीशमन विभागाला यश आलय.. शिर्डीतील आरबीएल बॅंक चौकात
असलेल्या अकरा केव्ही वरील विद्युत ट्राम्सफार्मवर एक माथेफिरु आत्महत्या
करण्याच्या उद्देश्यान चढला.. मात्र त्याचे दैव बलवत्तर म्हणून त्याच वेळी
कोपरगावहून येणारी 132 मुख्य विद्युत वाहिनीला ट्रपिंग झाली अन त्याचा जीव
वाचलाय..
त्यानंतर नगर परिषदेच्या अग्नीशमन विभागान त्याला सुखरुप खाली उतरवलय..
वाहीनी ट्रीप झाली होती त्यामुळे त्याचा जीव वाचला.. महत्वाच म्हणजे अकरा
केव्ही सुरु करण्या आधीच शिर्डी विद्युत सबस्टेशनला काही नागरिकांची माहीती
दिल्यान मोठा अनर्थ टळलाय.. संबधित व्यक्तीला त्याच्या नातेवाईंच्या
ताब्यात देण्यात आलेय तर विज वितरण कंपनी पोलिसात गुन्हा दाखल करणार आहे..