लोणी दि.१७( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणीच्या पद्यश्री विखे पाटील महाविद्यालयास महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र मार्फत करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संसदेचे अधिवेशनात करिअर कट्टा अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उपक्रमासाठी एक लाखाचे अनुदान प्रदान करण्यात आल्याची माहीती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डाॅ.ए.आर. पवार यांनी दिली.
दोन दिवशीय महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र मार्फत करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संसदेचे अधिवेशन बारामती येथील शारदाबाई महिला कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे पार पडले. समारोप कार्यक्रमा प्रसंगी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील करिअर कट्टा अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ साठी पहिल्या वर्षातील द्वितीय टप्यातील निधीचे वितरण करण्यात आले. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाला या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात एक लक्ष रुपयाचा धनादेश महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे,बी.व्ही.जी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड आणि विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्या डाॅ भाऊसाहेब रणपिसे,करीयर कट्टा समन्वयक डाॅ.व्हि.डी.निर्मळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी बारामती येथील अटल इन्कुबेशन सेंटर यांच्याशी विखे पाटील महाविद्यालयाने सामंजस्य करार करण्यात आला .
महाविद्यालयांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे यांनी अभिनंदन केले.