राहाता दि.१८ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राजकारणापेक्षा विकासाचा दृष्टीकोन ठेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे तालुक्यात होत आहे.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकास कामांना निधी कमी पडू दिला जात नाही.
योजनांच्या सुरू असलेल्या अंमलबजावणीतून सर्वसमावेश विकास होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पार्टील यांनी केले.
वाकडी येथे १० कोटी ६७ लाख किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक सौ रंजनाताई लहारे,कविता लहारे ,सरपंच रोहिणी आहेर,राजेंद्र लहारे, डॉ संपत राव शेळके, उपसरपंच सुरेश जाधव ,भाऊसाहेब लहारे, चंगदेव लोखंडे, जालिंदर लांडे,सुनील कुरकुटे,संदीपानंद लहारे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गुंजाळ, जि. प. उपअभियंता धापटकर यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ विखे पाटील म्हणाल्या गणेश परिसरावर विखे कुटूंबांचे कायमच प्रेम राहीले आहे. गोर गोरीब जनता हेच आपले कुंटुंब असून राजकारणा पेक्षाही समाजिक बांधिलकीचे काम करण्यावर भर दिला आहे. गटातटाचे राजकारण न करता जनताभिमुख काम करण्यावर भर दिला आहे.सत्तेची हवा डोक्यात न जाता जमिनीवर राहुन काम करतांना कुणी कितीही विरोध केला तरी सामान्य जनतेसाठी आम्ही कायमचं आपल्या सोबत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
राज्यात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काम करतांना वाळू घोरण, दुग्ध व्यवसायास चालना देण्याचा निर्णय करून या माध्यमातून सामान्य जनता हाच विकासाचा केंद्रबिंदू मानला आहे. देशाचे पतप्रधान नरेंद्रजी मोठी यांच्या प्रयत्नामुळे २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभु रामचंद्राच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. दिवाळी सणाप्रमाणे भक्तीमय वातावरणांत या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करा असे आवाहन त्यांनी केले.