लोणी दि.१९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज मधील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या प्रतीक्षा गुंजाळ व तृतीय वर्षात शिकत असलेल्या पूजा गाडेकर विद्यार्थ्यांनिनी दहा पैकी दहा एसजीपीए मिळवत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निकालात विक्रम करत उत्तुंग यश मिळविले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने यांनी दिली.
महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा, माजी विद्यार्थ्यांचा सहयोग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन , लॅब डेव्हलपमेंट साठी कोडजेनेक्स, कॅनडा कडून मिळालेले सेंटर ऑफ एक्सलन्स, प्रोजेक्ट अनुदान आणि विविध नामांकित कंपन्यांसोबत केलेल्या संलग्नता करार यामुळे विद्यार्थांच्या सर्व गुणांमध्ये विकास होत आहे आणि त्याचा परिपाक म्हणून विद्यार्थांना हे यश मिळत आहे अशी माहिती इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ सचिन कोरडे यांनी दिली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.