26 C
New York
Thursday, August 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातील समर्थची ३२ विद्यार्थ्यांची “गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि.पुणे या स्पॅनिश कंपनीमध्ये निवड

बेल्हे (जनता आवाज वृत्तसेवा) :- पुणे जिल्ह्यातील बेल्हे  येथील समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या “कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह २०२३” अंतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातील ३२ विद्यार्थ्यांची “गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि.पुणे या स्पॅनिश कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.

गेस्टॅम्प ही एक स्पॅनिश मल्टिनॅशनल कंपनी असून चार चाकी वाहनांसाठी मोठे, मध्यम आणि लहान आकाराचे स्टॅम्पिंग तसेच स्ट्रक्चरल कंपोनंट बनवले जातात.निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:साहिल पानमंद, अनिकेत ठाणगे, अनय भुजबळ, सुशांत सावंत, अभिषेक गाढवे, धनंजय शेटे, पुरुषोत्तम बनकर, उत्तम काशीद, श्रेयस बदे, अभिषेक काशीद, वैभव पवार, यश सरोदे, प्रणव शिंदे, हरेश्वर भांड, मच्छिंद्र आहेर, प्रतीक शिंदे, कुणाल तांबे, ऋषिकेश औटी, तन्मय भोर, जय गाजरे, रोहन गाडेकर, आर्यन डुंबरे, कोमल येवले, गौरी वाडेकर, समीना इनामदार, ज्योती निचित,प्रियंका पोखरकर, अनुजा अदक, श्रद्धा दांगट, कांचन चापडे, साक्षी अदक, ऋतुजा कुसळकर.
कंपनीच्या वतीने एच आर निर्मला जाधव तसेच टेक्निकल हेड किरण पवार यांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग या विभागातील विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!