11.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

श्रीगोंद्यात दारूच्या नशेत पित्यासह भावाचा चाकूने भोसकून खून

श्रीगोंदा दि. १९( जनता आवाज वृत्तसेवा ) :- श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील स्वस्तात सोने देण्याच्या प्रकरणातील अनेक गुन्ह्यात महत्वाचाआरोपी असलेल्या जावेद घडयाळ चव्हाण वय ३० वर्षे याने दारूच्या नशेत आपल्या कुटुंबातील पित्यासह भावाचा चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले आहे याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यामुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील आदिवासी समाज्यातील घडयाळ हिरामण चव्हाण हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते त्याने दौंड तालुकासह श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ठिकाणी घडलेल्या स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लूट केल्याप्रकरणी अनेक ठिकाणी त्याच्यासह त्याचे कुटुंब यांचेवर गुन्हे दाखल आहेत. त्यातच त्याच्या घरातील वादामुळे घड्याळ याची सून नांदत नव्हती त्यामुळे दि १८जानेवारी रोजी त्याच्याच घरातील त्याचा मुलगा जावेद घड्याळ चव्हाण हा दारू पिऊन त्याची नांदत नसलेली पत्नी आणण्यासाठी त्याचा पिता घड्याळ हिरामण चव्हाण यांचेकडे पत्नीला आणण्यासाठी पैश्याची मागणी करु लागला मात्र पिता कोणत्याही परिस्थितीत पैशे देत नसल्याने त्याची चांगलीच बाचाबाची होत अरेरावी सुरू झाली त्यांची भांडणे होत आहेत हे लक्षात आल्यावर आरोपीचा भाऊ महावीर घड्याळ चव्हाण मध्यस्थी करण्यासाठी गेल्यावर जावेद घड्याळ चव्हाण याने त्याच्या जवळील चाकू महावीर घड्याळ चव्हाण वय३८ वर्षे यांच्या पोटात चाकूने वार करत असताना हे पाहून मुलाला वाचविण्यासाठी पिता घड्याळ हिरामण चव्हाण वय५५ वर्षे हे गेले असता त्याांच्याही पोटात चाकू खुपसून दोघांचा खून करून तो पसार झाला. याबाबात अहमदनगर गुन्हे अन्वेषण पथकाला माहिती मिळताच त्यांनी तांत्रिक माहिती मिळवून आरोपीला अवघ्या काही तासातच आरोपी जावेद घड्याळ चव्हाण वय३० वर्षे यास जेरबंद केले असून त्यास बेलवंडी पोलिसांच्या स्वाधीन केले. बेलवंडी पोलिसात रिबिन घड्याळ चव्हाण वय ४९ वर्षे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे करीत आहेत.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!