लोणी दि.२० ( जनता आवाज वृत्तसेवा ):-बिबट्यांच्या हल्लात मयत झालेल्या लोणी येथील अथर्व प्रविण लहामगे यांच्या वारसांना शासनाच्या वतीने तातडीची मद्दत म्हणून दहा लाखांचा धनादेश जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. महसूल मंत्री आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाकडे विशेष प्रयत्न करून २५ लाखाची मदत जाहीर केली होती यापैकी तातडीची मद्दत दहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
रविवार दि. १४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी अथर्व प्रविण लहामगे वय ९ वर्ष हा बिबट्यांच्या हल्लात मयत झाला. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मयत अथर्व कुटुंबाचे सात्वन करत शासनाच्या वतीने २५ लाख रुपयांची मद्दत जाहीर केली होती. त्यानतंर केवळ पाच दिवसात वनविभागाने तातडीची मदत म्हणून १० लाखाचा धनादेश वारसदार प्रविण एकनाथ लहामगे आणि सौ. रिता प्रविण लहामगे यांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेञ सागर केदार, वनपाल विठ्ठल सानप, प्रतिक गजेवार, अमोल किनकर, संतोष सुरासे, लोणीच्या सरपंच कल्पना मैड, प्राणी मित्र विकास म्हस्के, शांतीनाथ आहेर, नवनाथ गोसावी आदी उपस्थित होते.
वन परिक्षेत्र अधिकारी श्री. सागर केदार म्हणाले महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनुसार वन विभागाची ड्रोन टिम सह विशेष पथक लोणी परिसरात कार्यरत आहे. लहान मुले आणि वयोवृध्द नागरीक यांनी सायंकाळी सहा ते सकाळी आठ यावेळेत बाहेर पडू नये. बिबट्यने शेळी, कुत्री, मनुष्य यावर हल्ला केल्यानतंर त्वरीत वन विभागाशी संपर्क अथवा प्राणी मित्रांशी संपर्क साधावा असे आवाहन करतांनाच अफवा पसरू नये असे आवाहन केले आहे.