राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-१८ रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना राहुरी तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी दिव्यांग मार्गदर्शन शिबिर व एका दिव्यांग बांधवास तीन चाकी सायकल वाटप कार्यक्रम संपन्न.संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार बच्चुभाऊ कडू स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष श्री रामदासजी खोत साहेब महाराष्ट्र राज्य महासचिव श्री बापूसाहेब काणे साहेब राज्य अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली दवणगाव ता राहुरी या ठिकाणी केसापूर,आंबी अमळनेर,संक्रापूर, या पंचक्रोशीतील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजना. अंतोदय कार्ड योजना व शासनाच्या वतीने दिव्यांगा बांधवांसाठी असणारे योजनेची माहिती जिल्हा अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना उत्तर अहमदनगर मधुकर घाडगे व जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर भाऊसाहेब खपके हे होते यावेळी दवणगाव येथील गोरक्षनाथ काळे यांच्या वतीने सुनील पवार यांना दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत एक तीन चाकी सायकल देण्यात आली.
तालुकाध्यक्ष योगेश लबडे व संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले दवणगाव पंचक्रोशीतील एकही दिव्यांग बांधव कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देण्यात आली यावेळी देवळाली प्रवरा येथील सहसचिव सुखदेव कीर्तने ,सरपंच भाऊसाहेब खपके दवणगाव,पहिलवान सुनिल खंपके ,येथील शाखा अध्यक्ष नानासाहेब खपके, केसापूर चे शाखा अध्यक्ष जालिंदर क्षीरसागर आंबी येथील अशोक साळुंके , भरत होन, सर्जेराव होन ,नाथू जऱ्हाड शाखासचिव ,भारत वाणी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.