8.8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

नगरपरिषदेसमोर कोपरगाव शहरासाठी अडीच कोटीचे आणखी एक व्यापारी संकुल – आ.आशुतोष काळे

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोपरगाव शहराच्या विकासाला भरघोस निधी देतांना कोपरगाव शहराच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी व्यापारी संकुल उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव शहरात उभारल्या जाणाऱ्या कोपरगाव बस स्थानकाच्या व्यापारी संकुलाबरोबरच कोपरगाव शहरात नगरपरिषदेसमोर अडीच कोटीचे आणखी एक दोन मजली व्यापारी संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली असून त्याबाबत त्यांनी नुकतीच कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

कोपरगाव बस स्थानकाची उभारणी करतांना ज्याप्रमाणे इतर शहरातील बस स्थानकाप्रमाणे कोपरगाव बस स्थानकाच्या चहुबाजूने व्यापारी संकुल उभारणे गरजेचे होते. परंतु नियोजनाच्या आभावापायी हे व्यापारी संकुल उभारले गेले नाही. त्यामुळे कोपरगाव बस स्थानकाच्या लगत असणाऱ्या जागेचा उपयोग करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून कोपरगाव बस स्थानकाच्या लगत असलेल्या परिसरात व्यापारी संकुलासाठी मंजुरी मिळवून व्यापारी संकुलाच्या १४ कोटीच्या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच सुसज्ज व्यापारी संकुल उभे राहणार आहे. त्याचबरोबर आ. आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून केंद्र शासनाच्या भांडवली खर्च योजने अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेला अडीच कोटीचे आणखी एक व्यापारी संकुल मिळवून दिले आहे. त्यामुळे निश्चितपणे कोपरगाव शहराची आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होण्याबरोबरच सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय करण्यसाठी संधी उपलब्ध होणार आहे.

त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगर रचनाकार किरण जोशी, आर्किटेक्ट अचल राजे आदी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून दोन मजली असलेल्या या अडीच कोटीच्या व्यापारी संकुलाच्या नियोजित आराखड्या बाबत सविस्तर चर्चा केली. पहिला व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी एकूण १५ व्यापारी संकुल बांधण्यात येणार असून पार्किंग व्यवस्था त्याबरोबरच नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा बाबत आ. आशुतोष काळे यांनी माहिती जाणून घेवून उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच यापूर्वी पोस्ट ऑफिस जवळ आणि बाजार तळ याठिकाणी वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत दोन व्यापारी सकुल मंजूर करण्यात आलेले आहे त्याच्याही निविदा लवकरच प्रसिद्ध होणार असून कोपरगाव शहरातील ज्या परिसरात मोकळी जागा आहे त्या परिसरात व्यापारी संकुल उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!