8.8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

आयोध्येतील मंदीर लोकार्पणाचा कार्यक्रम संपूर्ण भारतीयांच्या मनात नवचैतन्य निर्माण करणारा- ना. राधाकृष्ण विखे पाटील

पारनेर दि.२१( जनता आवाज वृत्तसेवा ):-आयोध्येतील मंदीर लोकार्पणाचा कार्यक्रम संपूर्ण भारतीयांच्या मनात नवचैतन्य निर्माण करणारा आहे.हिंदू संस्कृती आणि परंपरेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आशा कामाला विरोध करणाऱ्यांना जनता खड्या सारखे बाजूला काढेल असे प्रतिपादन महसूल तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

श्रीक्षेत्र कोरठण येथे खंडोबा महराजांचे दर्शन घेवून मंत्री विखे पाटील यांनी महाआरती केली.प्रभू श्रीरामांच्या आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या नामघोषांने अवघा मंदीर परीसर दुमदुमून गेला.मंदीर विश्वस्त समितीच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग,विश्वनाथ कोरडे देवस्थानच्या अध्यक्षा शालीनी घुले काशिनाथ दाते भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे शिवसेनेचे राहूल शिंदे सौ.आश्विनी थोरात बाबासाहेब खिलारी आदी याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे म्हणाले की,सोमवारी आयोध्येत संपन्न होणार्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देश राममय झाला आहे.मंदीर निर्माण करण्यासाठी न्यायालयाने निकाल दिल्यानंतर चार वर्षात मंदीराचे पूर्ण झालेले काम हे सर्व भारतीयांच्या मनात चैतन्य आणि उर्जा निर्माण करणारे आहे.मानवतेच्या कल्याणाची परंपरा हिंदू धर्माच्या संस्कृती मध्ये आहे.राम मंदीर निर्माणाच्या निमिताने देशाच्या विकासाचे सुवर्णपर्व सुरू होईल हा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे.

आज हिंदू धर्मावर टिका करून जाणीवपुर्वक विरोधात बोलले जाते.हिंदू धर्मावर होणार्या येणार्या संकटाच्या विरोधात आता ताकद दाखवून देण्याची वेळ हीच असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.पण आज राम मंदीराच्या लोकार्पणाच्या कार्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातो हे दुर्दैवाने म्हणावे लागते.पण हिंदू धर्मावर टिका करून विरोधात बोलणार्या प्रवृतीना जनता विरोध केल्याशिवाय राहाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.तालुक्यातील पाणी प्रश्नाच्या बाबतीत तालुक्यातील पदाधिकार्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची गांभीर्याने दखल घेवून तातडीने अधिकार्या समवेत बैठक बोलावून निर्णय करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

कर्जत तालुक्यातील श्री.गोदड महाराजांच्या समाधी स्थळाचे मंत्री विखे पाटील यांनी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्या समवेत दर्शन घेतले.आयोध्येतील अध्यात्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण देशातीलच अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा मिळाला असून ही परंपरा पुढे घेवून जाण्याचा संकल्प २२तारखेच्या निमिताने आपल्या सर्वाना करायचा असल्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!