टाकळीभान (जनता आवाज वृत्तसेवा):- टाकळीभान येथील जय श्रीराम व साईबाबा यांच्या पालखीचं आगमन झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संचालक मयुर पटारे व विद्याताई दाभाडे यांच्यासह कर्मचारी आणि व्यापारी वर्ग यांनी पालखीचे मोठ्या जल्लोषात आणि जयघोषात तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले. यावेळी संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते.
तसंच ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामघोषाने आणि टाळ-मृदंगाचा गजराने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. दोन्ही दिंडीतील पादुकांचे संचालक व शाखा व्यवस्थापक यांनी विधिवत पूजन करत पुष्पहार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले आणि गावातील सर्व नागरिकांना सुख,समाधान तसेच ऐश्वर्य मिळो अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना केली. तसेच विनेकरी यांचा हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपबाजार आवारच्या वतीने लोकनेते माजी आमदार श्री भानुदास मुरकुटे आणि जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभापती सुधीर नवले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मयुर पटारे आणि विद्याताई दाभाडे यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांच्या नाष्ट्याचे व चहापानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, संत सावताचे संचालक विलास दाभाडे, बाजार समितीचे संचालक किशोर बनसोडे, माजी संचालक दत्तात्रय नाईक, राजेंद्र कोकणे, माजी उपसरपंच भारत भवार, संचालक यशवंत रणनवरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील बोडखे, शिवाजी पटारे, तुकाराम बोडखे, सोमनाथ पाबळे, मोहन रणनवरे, शिवाजी पवार, दत्तात्रय पटारे, गजेंद्र कोकणे, संजय पटारे, महेंद्र संत, संदीप कोकणे, बापूसाहेब शिंदे, मधुकर गायकवाड, माळवदे मामा, शाखा व्यवस्थापक दिनकर पवार यांच्यासह उपबाजार आवारातील व्यापारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.