6.2 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

महिला मंडळा समवेत सौ.चैतालीताई काळेंनी केले श्री रामरक्षा व श्री हनुमान चालीसाचे पठण

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- मागील पाचशे वर्षापासून देशभरातील तमाम देशभक्त ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते तो श्रीराम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा सोमवार (दि.२२) रोजी होत असून देशभर सर्वत्र श्रीराममय वातावरण झाले असुन प्रत्येक मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोपरगाव शहरात देखील या अभूतपूर्व सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिरात विविध महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री रामरक्षा व श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी उपस्थित राहून श्री रामरक्षा व श्री हनुमान चालीसाचे पठण केले.

रामजन्मभूमी अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलला विराजमान झाले आहेत. सोमवार २२ जानेवारी रोजी दुपारी उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात प्रभू श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. राम हे दोन शब्द उच्चारले तरी मनाला शांतता, प्रसन्नता, उर्जा, उत्साह, समाधान मिळते. प्रभु श्रीरामाला प्रसन्‍न करायचं असेल, तर सर्वात सोपा उपाय म्हणजे श्री राम चालीसा पाठ करणे. श्री राम चालिसेचा पाठ केल्यानं आपली सर्व कार्ये सफल होतील आणि प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आपल्यावर राहील.या उद्देशातून ऐतिहासिक प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावातील श्रीराम मंदिरात विविध महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री रामरक्षा व श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला सौ. चैतालीताई काळे उपस्थित होत्या.तसेच यावेळी सकल हिंदू समाज, जुने गावठाण यांच्या वतीने श्री जबरेश्वर मंदिर ते दत्तपार पर्यंत काढण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिर निमंत्रण परिक्रमा मिरवणुकीत सौ. चैतालीताई काळे यांनी सहभागी होवून दत्तपार श्रीराम मंदिर येथे समारोपाची आरती केली.

यावेळी वनिता महिला मंडळ कुंकुमार्चन ग्रुप व ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या श्रद्धाताई जवाद, उमाताई वहाडणे, सीमाताई मुरुदगण, वंदनाताई चिकटे, रुपालीताई सातपुते, नेत्रताई कुलकर्णी, विद्याताई गोखले, स्वातीताई मुळे, शैलाताई लावर, वैदेहीताई किर्लोस्कर,जिजाऊ महिला मंडळाच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा प्रतिभाताई शिलेदार, तालुकाध्यक्षा स्वप्नजाताई वाबळे, विजयाताई देवकर, रुपालीताई भोकरे, मंगलताई भोकरे, मीनाताई सरोदे, धनश्रीताई देवरे, शिलाताई वडांगळे, प्रभाताई तपसे, उमाताई कवडे, जयश्रीताई कवडे, शारदाताई सुरळे, वर्षाताई कापसे, सुमिताताई आदिक, भक्तीताई आढाव, वैशालीताई काकडे, सुप्रियाताई निळेकर, अनिताताई मगर, सोनालीताई शिंदे, प्रभू श्रीराम मंदिर निमंत्रण परिक्रमामध्ये माजी नगराध्यक्षज विजयराव वहाडणे, दत्तात्रयजी ठोंबरे, गुरु शाम जोशी, राहुल देवळालीकर, बाळासाहेब रुईकर, धनंजय कहार, मनोज नरोडे, सागर लकारे, रोहित खडांगळे, राकेश शहा, विलास आढाव, सुनील फंड, सुनील खैरे, रमेश कोऱ्हाळकर, संतोष चव्हाण, सुनील बंब, रितेश राऊत, प्रसाद ठोंबरे, सुदर्शन वाकचौरे, पवन अंभोरे, प्रसाद रुईकर आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!