शिर्डी दि.२२ ( जनता आवाज वृत्तसेवा):-टाळ मृदूंगाच्या गजरामध्ये साईरामाचा जयघोष करीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई मंदीरात आयोध्येतील श्रीराम मूर्ती स्थापनेचा आनंदोत्सव साजरा केला.यानिमिताने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात भाविकांसह सहभागी झाले.
श्री राम मंदीर उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने साईमंदीरात सजावट करण्यात आली होती.दुपारी टाळघोषाचा गजर करीत पालखीच्या मिरवणुकीला प्रांरभ झाला.मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मंत्रोच्चारात साईच्या पादुकांची पूजा करण्यात आली.शिर्डी माझे पंढरपूर या आरतीने तल्लीन झालेल्या सर्वच भाविकांनी साईरमाचा गजर करून आयोध्येतील ऐतिहासिक क्षणाचा आनंद द्विगुणीत केला.
मुख्य सभागृहातून प्रभू श्रीरामाची प्रतिमा घेवून मंत्री विखे पाटील पालखी सोहळ्यात सहभागी झाले.टाळ मृदूंग आणि झांज पथक पालखीच्या पुढे होते.साईराम आणि साईबाबांचा जयघोष करीत भाविक आणि स्थानिक कार्यकर्ते या सोहळ्यात सहभागी झाले होते.
माजी नगराध्यक्ष कैलास कोते अभय शेळके भाजपाचे अध्यक्ष सचिन शिंदे विलास कोते भाजयुमोचे अध्यक्ष योगेश गोंदकर अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर प्रांताधिकारी माणिक आहेर तहसिलदार अमोल मोरे यांच्यासह संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.
मंदीर परीसरात भाजयुमोच्या वतीने साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या देखाव्याची पाहाणी करून मंत्री विखे पाटील यांनी दर्शन घेतले.त्यांच्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.किरण बोराडे योगेश गोंदकर अशोक पवार यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामाचे मंदीर निर्माणाचे कार्य ही देशातील नागरीकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटना आहे.मंदीर उभारणीच्या माध्यमातून विकसित राष्ट्राच्या निर्मीतीचा शुभारंभ झाला आहे.प्रभू श्रीरामाचे मंदीर हे सर्वासाठी उर्जा आणि प्रेरणा स्त्रोत ठरणार असून,पाचशे वर्षाचा संघर्ष यासाठी झाला.मंदीर निर्माणाच्या कार्यामध्ये योगदान देणारे कारसेवक समर्पित भावनेन यासर्व वाटचालीत कार्यरत होते.अनेकांचे यामध्ये बलिदान झाले.त्यासर्वाचे स्मरण आजच्या दिवशी होत आहे.नगर जिल्ह्यातील आचार्य गोविंद गिरीजी महाराज तसेच ह.भ.प.भास्कर गिरीजी महाराज यांचा या मंदीराच्या विश्वस्त कमिटी मध्ये असलेला समावेश ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.