संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-दिव्यांगांना बंधू-भगिनींना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या घुलेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच व सदस्य कायदेशिर कारवाई करावी अन्यथा त्यांच्या विरोधात दिव्यांग साह्य सेनेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशार, उद्धव ठाकरे गटाच्या दिव्यांग सहाय्य सेनेच्यावतीने जिल्हा अध्यक्ष जालिंदर लहामगे यांनी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्राम पंचायतीने गेल्या दोन वर्षापासून दिव्यांग बंधू आणि भगिनींना मालमत्ता करातील ५ टक्के निधीचा लाभ दिला नाही व इतर योजनांचा सुद्धा लाभ दिलेला नाही, त्या मुळे परिसरातील दिव्यांग बंधू व भगिनीं मध्ये नाराजीचे वातावरण पसरलेलेआहे.
दिव्यांग सहाय्य सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लाहामगे यांनी घुलेवाडी ग्राम पंचायतीकडे माहिती अधिकारातदिलेल्या १७२ दिव्यांग बंधू व भगिनींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची छाननी आपले स्तरावरून करण्यात यावी , पात्र लाभार्थीची खात्री करुन दिव्यांगांची यादी आपल्या सही शिक्क्याने देण्यात यावी. अशा प्रमुख मागण्या गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे यावेळी दिव्यांग सहाय्य सेनेचे शहरा ध्यक्ष कैलास उदावंत, पौर्णिमा आढाव, विलास राऊत, भाऊसाहेब ढोले, शरद पानसरे, सिताराम पानसरे उपस्थित होते.