10.3 C
New York
Tuesday, November 26, 2024

Buy now

spot_img
spot_img

श्री एकदंत गणेश मंदिराच्या वतीने श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळा विविध कार्यक्रमाने साजरा प्रभू श्रीरामांना १२२ भोग नैवेद्य ; प्रभू श्रीरामांचे परिसरातून भव्य मिरवणूक

नगर( जनता आवाज वृत्तसेवा):- प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला आहे. श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेत. त्यानिमित्ताने दातरंगे मळा, एकदंत कॉलनी येथील श्री एकदंत गणेश मंदिराच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या भक्ती भावाने हा उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये प्रभू श्रीरामांना 122 भोग नैवेद्य, सांस्कृतिक कार्यक्रम बक्ताम्मा, प्रभू श्रीरामांचे भव्य मिरवणूक, महाआरती, महाप्रसाद (भंडारा)असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

श्री एकदंत गणेश आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आले. प्रभू श्रीरामांचे चार फुटी मूर्ती लावण्यात आली. मंदिर परिसरात सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले.भव्य रांगोळी काढण्यात आली. यावेळी प्रभू श्रीरामांना 122 महिलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या 122 पदार्थ भोग नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम बक्ताम्मा खेळण्यात आला. या खेळात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

श्री एकदंत गणेश मंदिराच्या वतीने प्रभू श्रीरामांचे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बालकांनी प्रभू श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान वेशभूषा धारण करून सहभागी झाले. मिरवणूक मार्गावर भव्य रांगोळी काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सर्व महिलांनी केसरी रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. पुरुषही मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. पुरुषांनी डोक्यावर भगव्या टोप्या व गळ्यात भगव्या पंचा घातल्या होत्या. ही मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीने, प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने दातरंगे मळा परिसरात काढण्यात आली. मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले व दातरंगे मळा परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. मिरवणूक संपन्न झाल्यानंतर डान्स मनोरंजन कार्यक्रम पार पडला. यामध्ये परिसरातील बालकांनी आपली कला सादर करून भाविकांचे मने जिंकली.

प्रभू श्रीरामांची व श्री गणेशाची महाआरती करून भाविकांना महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात आले. यावेळी असंख्य भावीक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री एकदंत गणेश मंडळ व श्री एकदंत महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!