संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर शहरातील प्रत्येक उपनगरात गल्लोगल्ली आणि तालुक्यात प्रत्येकाच्या घरोघरी सडा रांगोळ्या काढत पुष्पवृष्टी … फटाक्याची आतिषबाजी…. लाडू खिचडी प्रसादाचे वाटप .. प्रत्येकाच्या घरावर भगवा ध्वज आणि फटाक्याची आतिषबाजी करत प्रत्येकाच्या तोंडून फक्त जय श्रीरामचा नारा देत अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद संगमनेरकर जनतेने द्विगुणित केला.
अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्रीराम लल्लाची आकर्षक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. त्या निमित्त संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकातील ,नवीन नगररोडवरील अभिनव नगरमधील तसेच पंजाबी कॉलनीतील श्रीराम मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरा मध्ये अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा च्या वेळी महिला आणि पुरुष भाविकांनी शंख वाजविला. दिवसभर या सर्व श्रीराम मंदिरांत राम भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.तसेच शहरातील प्रत्येक चौकाचौका मध्ये प्रभू श्रीरामांची प्रतिमा तसेच मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.तर शहराच्याबरोबर तालुक्याच्या ग्रामीण भागातही घरोघरी व दुकानांसमोर सडा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातील प्रत्येक गावा गावातील हनुमान मंदिरात भजन कीर्तन सह अनेक कार्यक्रम करण्यात आले. तसेच विविध गावांमध्ये महिलांनी भुगड्या तर पुरुषांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला . तसेच श्रीरामांची शाल आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती .
संगमनेर शहरातील बस स्थानका जवळ वडगाव पान येथील विश्व दत्त फाउं डेशनच्या वतीने गडगे महाराज यांनी ११ हजार लाडूचे वाटप केले .संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष अमोल खताळ यांच्यावतीने दत्त मंदिर परिसरात साबुदाणा खिचडीचे, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ५१ हजार लाडूचे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या वतीने सर्व मंदिरांमध्ये लाडूचे वाटप करण्यात आले . अभिनव नगर मध्ये राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लाडू वाटण्यात आले तसेच संगमनेरकरांनी न भूतो न भविष्यता असा अयोध्यातील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा लाईव्ह सोहळा एलईडी स्क्रीनवर अनुभवला
संगमनेरला१४तोफांच्या सलामी तरआंबीदुमालात रांगोळीतून साकारले श्रीराम संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बस स्थानकाजवळ युवामहेश सकल हिंदू समाजाच्यावतीनेअयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होताच१४ तोफांच्या सलामी देण्यात आल्या . तसेच पठार भागातील आंबी दुमाला गावातील रोकडेश्वरमंदिरात गावातीलच नवनाथ सरोदे या तरुणांने काढलेल्या रांगोळीतून प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा साकारली हे दोन खास आकर्षण ठरले.