नगर( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर कॉलेज हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिले आणि सर्वात नावाजलेले असे महाविद्यालय आहे. पारंपारिक तसेच नवीन काळातील विषयांसाठी शिक्षण देणारी ही एक प्रमुख संस्था मानली जाते. महाविद्यालयाचे नाव, गुणवत्ता आणि शिक्षणाचा प्रसार हे मुलभुत उदिष्ट असुन ते पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. या महाविद्यालयातुन अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले, त्यांच्या पायावर ऊभे राहिले. राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर उच्चपदांवर अनेक विद्यार्थी आज कार्यरत आहेत. या सर्वांचा ओढा अहमदनगर महाविद्यालयात येण्यासाठी कायम असतोआणि म्हणूनच या सर्वांना एकाच मंचावर आणण्यासाठी अहमदनगर महाविद्यालय माजी विद्यार्थी संस्थेने पुढाकार घेउन स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे.
महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संस्थेने दि. २७/०१/२०२४ रोजी १९७०- २०२० पर्यंतच्या नगर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेह मेळावा आयोजित केला आहे. सकाळी ११,०० ते ४.०० वाजेपर्यंत लायब्ररी कॉन्फरन्स हॉल मध्ये हा मेळावा संपन्न होईल. यासाठी कुठलेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉआर. जे. बार्नबस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाल्यानंतर, माजी विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील त्यानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम झाल्यानंतर माजी विद्यार्थी विवीध विभागांना भेट देतील व महाविद्यालय परिसरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतील, असे माजी विद्यार्थी संस्थेचे सचिव डॉ. अभिजीत कुलकर्णी यांच्याकडून सांगण्यात आले. या स्नेह मेळाव्याला नगर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत रहावे असे अवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.