10.3 C
New York
Tuesday, November 26, 2024

Buy now

spot_img
spot_img

शाश्वत समाजकार्यासाठी खेड्याकडे चला – सौ. शालिनीताई विखे पाटील

सात्रळ, दि.२३( जनता आवाज वृत्तसेवा ) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्यामध्ये जे नवनिर्माणाचे काम केले तसे तुम्हीही श्री क्षेत्र धनेश्वर देवस्थान धानोरे घाट परिसर स्वच्छता करून करा. देवाला माना परंतु अंधश्रद्धेचे बळी पडू नका. शिबिरात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जिल्हा परिषदेच्या अनेक विधायक योजनांची विकास कामे ग्रामीण भागात करून समाजाभिमुख मूर्त स्वरूपाचे काम उभे करावे. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी शाश्वत समाजकार्यासाठी खेड्याकडे चला, अशी आर्तहाक अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी शिबिरार्थींना दिली.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानोरे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. शामू बाळू माळी हे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील, संस्थेचे संचालक ॲड. आप्पासाहेब दिघे पाटील, श्री. सुभाष अंत्रे पाटील, विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. किरण दिघे, प्रवरा सहकारी बँकेचे संचालक श्री. बाळासाहेब दिघे, वसंतराव डुक्रे, सुभाष नामदेव अंत्रे, पाराजी धनवट पाटील, सोपान पाराजी दिघे, रंगनाथ भिकाजी दिघे, ॲड. चांगदेव दिघे, सुभाष गणपत दिघे, डॉ. विठ्ठल शिंदे, धानोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. ज्ञानदेव दिघे, डॉ. पोपट दिघे, सदस्य श्री. दिगंबर दिघे, सौ. प्रतिभा दिघे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य रंगनाथ दिघे, जयवंत जोर्वेकर, पाराजी धनवट, रमेश पन्हाळे, पांडुरंग दिघे, भास्कर दिघे, गोकुळ दिघे, रंगनाथ शिंदे, किशोर दिघे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एम. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, राष्ट्रीय सेवा योजनांचे बोधचिन्ह आपणास अविरत समाजकार्यासाठी झटत राहावे हे शिकवते. याप्रसंगी त्यांनी स्वयंसेवकांशी प्रश्नोत्तररूपी संवाद साधला. यावेळी प्रवरा सहकारी बँकेचे संचालक श्री. बाळासाहेब दिघे यांनीही मार्गदर्शन केले. “युवकांचा ध्यास – ग्राम – शहर विकास, लोकसंख्या नियंत्रण व जनजागृती” हे ब्रीद घेऊन सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिरात ग्रामस्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता, लोकसंख्या नियंत्रण व जनजागृती, नव – मतदार जनजागृती, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तिमत्त्व विकास, पाणलोट विकास कार्यक्रम, अक्षय ऊर्जा जनजागृती, प्रबोधनपर पथनाट्य, अंधश्रद्धा निर्मूलन, संस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य चाचणी इत्यादी शिबिर काळातील उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थांशी संवाद साधण्यात येणार आहे.

उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. दीप्ती आगरकर यांनी केले. आभार प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या वाजे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहिदास भडकवाड, प्रा. राजू मोरे, डॉ. निलेश कान्हे, प्रा. दिनकर घाणे, डॉ. विजय शिंदे, डॉ. अमित वाघमारे, डॉ. गंगाराम वडीतके, प्रा. लतिका पंडुरे, प्रा. स्वाती कडू, डॉ. गजानन मांढरे, प्रा. नयना अवताडे, कांतीलाल जाधव, रासेयो स्वयंसेवक प्रतिनिधी कु. गौरी प्रधान, ऋषिकेश आनाप यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!