संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्या मध्ये अलगद अडकला .त्यामुळे टाळूची वाडी परिसरातील शेतकर्यांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले नजीक असणाऱ्या टाळूची वाडी येथे गेल्या दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता.अनेक शेतकर्यांच्या शेळ्या फस्त केल्या होत्या. त्यामुळे शेतकरी अक्षरशः या बिबट्याला वैतागले होते.तीन दिवसांपूर्वीटाळूचीवाडी परिसरात वनविभागाने आदेशघुलेयांच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता.सोमवारी पहाटे भक्षाच्या शोधात फिरणारा बिबट्या अलगद वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्या मध्ये अलगद अडकला.
बिबट्या जेरबंद झाल्याची वार्ता संपूर्ण गावात पसरतात टाळूचीवाडी परिसरात राहणारे आदेश घुले यांच्या शेतात पकड लेल्या बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.घटनेची माहितीमिळताच वनपाल चैतन्य कासार,आरूण देशमुख, वन कर्मचारी एकनाथ घुले यांनी घटना स्थळी धाव जाऊन पिंजऱ्यात पकडले ल्या बिबट्याला संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेत नेण्यात आले आहे.