9.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

आपणास मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षांवर्ष खुला राहणार नाही, हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघावे- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गर्भित इशारा

पुणे (जनता आवाज वृत्तसेवा):- जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी या गावांमधून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण यात्रा पुणे जिल्ह्यातून मुंबईकडे जात असून, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की,” मराठा समाज एकत्रित आहे, तरीही त्यांच्या लक्षात येत नाही. हे आंदोलन किती गांभीर्याने घ्यायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही. शब्द दिल्यामुळे त्यांना यायला लाज वाटत असेल, त्यामुळे सरकारने शहाणपण घेतलं तर बरं राहील. समाजाला वेड्यात काढन सोडावं. आरक्षण मिळालं तरी माझ्या जातीपुढे अनेक प्रश्न आहेत. तसेच, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षांवर्ष खुला राहणार नाही, हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघावे. मराठ्यांची दिशा आणि मराठ्यांचे वार कुठल्या दिशेने आहे हे सरकारलापण कळत नाही. सत्तेचा राग डोक्यात ठेवून काम करत असाल, तर सत्ता येत असते आणि जात असते. पण मराठे कायमचे आयुष्यातून राजकीय सुपडासाप करतील, असा सरकारमधील नेत्यांना जरांगे यांनी इशारा दिला आहे. 

यादरम्यान पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,“ आंतरवालीत काही चूक नसताना सरकारने प्रयोग केला. त्यामुळे आम्ही यावेळी सावध आहोत. आरक्षण असलेला आणि आरक्षण नसलेला मराठा एकत्र आला नाही, तर आरक्षण सोडून अनेक प्रश्न आहेत. त्यात जर दरी निर्माण झाली, तर पुन्हा ते कधीही एकत्रित येणार नाहीत. सरकार झोपी गेलंय का? त्यांना हे दिसत नाही का?, लेकरं मोठी करायची तर संघर्ष करावा लागणार आहे. मुंबईकरांनी तांब्या भरून पाणी द्यावं अशी अपेक्षा आम्हाला आहे. समाजासाठी थोडा त्रास सहन करावा, सर्व जाती धर्मातील मुंबईच्या लोकांना हात जोडून अवाहन आहे. शांततेत आमरण उपोषण करणारच, समाजासाठी मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही. मी मरायला सुद्धा भीत नाही, असेही जरांगे म्हणाले.

महाराष्ट्र सरकारला सात महिन्याचा कालावधी देऊनही मराठा आरक्षण देऊ शकले नाही यामुळे मराठा समाजामध्ये सरकार विषयी रोष  निर्माण झाला आहे. मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापूर्वी सरकारला ठोस असे पावले उचलावे लागेल  अन्यथा 26  तारखेपासून निर्माण होणाऱ्या परिस्थितीत सरकार स्वतः जबाबदार राहील. जालना येथून निघालेल्या मराठा आंदोलकाच्या पदयात्रेचा बीड व नगर, पारनेर, शिरूर, सुपा या ठिकाणी स्थानिक लोकांनी स्वतःहून भाकरी, पाण्याच्या बाटल्या, फळे, चहा व नाश्त्याची सोय केली होती. मराठा आरक्षणाविषयी संपूर्ण मराठा समाज एकवटले  दिसून येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!