9.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज च्या सात विद्यार्थ्यांची विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

लोणी दि.२३( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनियरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या सात विद्यार्थ्यांची न्यूमेट्री टेक्नॉलॉजीज पुणे, वाईडफाय पुणे व ट्रोन सॉफ्टटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या बहुराष्ट्रीय कंपण्यामध्ये निवड झाली अशी माहीती प्राचार्य डाॅ. संजय गुल्हाने यांनी दिली.

यामध्ये कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागच्या सृष्टी सोनावणे, स्नेहल कुऱ्हे व शिवानी कडू तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग विभागाच्या समर्थ ढोकचौळे यांची न्यूमेट्री टेक्नॉलॉजीज पुणे या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग विभागच्याच जयेंद्र शिपनकर याची वाईडफाय पुणे व नेहा शिंदे हीची ट्रोन सॉफ्टटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीमध्ये नोकरी साठी शिकत असतानाच निवड झाली आहे अशी माहिती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. सचिन कोरडे यांनी सांगितली.

कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ मिनिनाथ बेंद्रे यांनी यावेळी सांगितले की प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी नेहमीच प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ व प्लेसमेंट साठी विविध कोर्सेस व ऍक्टिव्हिटी चे आयोजन करत असते.यामध्ये सॉफ्टवेअर व स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस, एंटरप्रीन्यूअरशिप इंटरनॅशनल प्रोग्रॅम, करियर मार्गदर्शन, सराव मुलाखत इत्यादी उपक्रमांचा अंतर्भाव आहे.

माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा, माजी विद्यार्थ्यांचा सहयोग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन , लॅब डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट अनुदान आणि विविध नामांकित कंपन्यांसोबत केलेल्या संलग्नता करार यामुळे कॉम्प्युटर इंजिनियरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग विभागांच्या मागील पाच वर्षांपासून उत्कृष्ठ प्लेसमेंट झालेली आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट होण्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग विभागाचे प्लेसमेंट समन्वयक प्रा.दिपक साळुंके, प्रा. गणेश कोते, कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. सचिन कोरडे, कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ मिनीनाथ बेंद्रे, संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. मनोज परजने, तसेच यांनी परिश्रम घेतले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!